बुधवारी हे Ganesh Mantra देईल मनवांछित फळ
बुधवार गणपतीची उपासना करण्यासाठी सर्वांत शुभ दिवस असतो. या मंगळ दिवशी गणेश मंत्र उच्चारित करून गणेश पूजन केल्यास बुद्धी, ज्ञान व शक्तीत वाढ होते. पहाटे अंघोळ करून गणपती मंदिरात आकडे किंवा शेंदूर लेपीत गणपतीच्या मूर्तीला स्नान करवावे. तूप आणि शेंदूर लावावे. चंदन, पिवळे सुगंधित फुलं, 5 किंवा 21 दूर्वांची जोडी, जानवं, नारळ, गूळ-धणे आणि सुपारी अर्पण करून आपल्या सार्मथ्यप्रमाणे लाडवांचा नैवेघ दाखवावा.
पूजा झाल्यावर धूप आणि दिवा लावून या गणेश मंत्राचा जाप करावा: त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय। नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्।
यानंतर आरती ओवाळून व कपाळावर शेंदूर लावून प्रसाद ग्रहण करावा.