रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गुजरात विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (18:15 IST)

Gujarat Assembly Election 2022:गुजरात निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा संपला

पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे मतदानाची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती. गुरुवारी (1 डिसेंबर) गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान झाले. त्यात सौराष्ट्र-कच्छ आणि दक्षिण भागातील19 जिल्ह्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 788 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
 
निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदानाच्या अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाले आहे. काही तुरळक घटना आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी वगळता, सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
 
14,382 मतदान केंद्रांवर मतदान झाले
गुरुवारी 14,382 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली, त्यापैकी 3,311 शहरी आणि 11,071 ग्रामीण भागातील आहेत. मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी 13,065 मतदान केंद्रांवरून थेट वेबकास्ट करण्यात आले. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता असून सलग सातव्यांदा सत्ता काबीज करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. यावेळी भाजप केवळ काँग्रेसच्या विरोधात नाही तर आम आदमी पार्टी (आप) देखील मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.
Edited by : Smita Joshi