Daily Horoscope
✕

प्रयत्क्षात गुरु नसतील तर गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी?

Updated: बुधवार, 29 जुलै 2026 (08:15 IST)
महर्षी वेदव्यास: गुरूपौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. त्यामुळे महर्षी वेदव्यास हे सर्व जगताचे आद्यगुरू आहेत. त्यांचे स्मरण करून पूजा करू शकता.
भगवान दत्तात्रेय / श्रीस्वामी समर्थ / श्री गजानन महाराज: दत्ततत्त्वाला गुरुरूपातील सर्वोच्च स्थान आहे. त्यांच्या फोटोची किंवा प्रतिमेची पूजा करावी.
भगवान श्रीकृष्ण: "कृष्णं वन्दे जगद्गुरुम्" या उक्तीनुसार श्रीकृष्णाला जगद्गुरू मानून त्यांची पूजा करू शकता.
भगवान शिव (महादेव): महादेवांना अध्यात्मातील सर्वात पहिले गुरू (आदिगुरू) मानले जाते.
 
४. ज्ञान ग्रंथांची पूजा
गुरूंचा मुख्य उद्देश शिष्याला ज्ञान देणे हा असतो. त्यामुळे ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ग्रंथांची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते.
भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र किंवा तुमच्या धर्मातील प्रमुख पवित्र ग्रंथाला चौरंगावर ठेवून त्याला तुळशी/फुले वाहा, नमस्कार करा आणि त्यातील काही भागाचे वाचन करा.
 
५. गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या विशेष गोष्टी
गुरुचरित्र किंवा ज्ञानेश्वरीतील काही अध्यायांचे वाचन: या दिवशी ग्रंथांचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
दानधर्म: गुरूंच्या नावाने गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा पुस्तकांचे दान करा.
सत्कर्म: आपल्या गुरूंच्या शिकवणीचे पालन करणे हीच गुरूंची सर्वात मोठी पूजा आहे.
 
गुरूंप्रती वाटणारी निष्ठा, आदर आणि कृतज्ञता हीच खरी पूजेची सामग्री आहे. त्यामुळे गुरू प्रत्यक्ष समोर नसले तरी तुमचे श्रद्धास्थान आणि मन शुद्ध असेल, तर तुमचा भाव गुरूंपर्यंत नक्की पोहोचतो.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दिवाळीत देवदर्शन आणि पर्यटन एकत्र करायचे? नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी सहलीचे नियोजन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

नरक चतुर्दशीला काय करावे आणि काय करू नये? महत्त्वाचे नियम जाणून घ्या

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments