Dharma Sangrah

श्री परशुराम माहात्म्य अध्याय १

Updated: बुधवार, 8 मे 2024 (13:25 IST)
करी भक्त नमस्कारु मूर्ती पाहे ध्यानी नरु चतुर्भुज वीणा थोरु सामवेदे नादित ॥१५॥
करि द्वये वेदभारु भये तर्क मुद्रा करु तुर्य हरुनी पद्मवरु मुखचंद्र केवळ ॥१६॥
उटी पुष्पें परिमळ अतर्क वस्त्र अमोळ सिंहासनीं सुसोज्वळ भाळी कुंकुम शोभतें ॥१७॥
ब्रह्म यशमाळा गळा विग्रह बहू कोवळा जैसा दिसे लोणी गोळा ज्ञान तेज भव्यचि ॥१८॥
त्‍हृदयीं ध्यान पाहोनी मागे इच्छा तो नमोनी देती जाली सत्कृपेनी विद्यामाता भारती ॥१९॥
श्रीवेद व्यास मुनीसी ध्यान साष्टांग मानसीं अत्यंत प्रेमें लक्षेंसी त्दृत्कमळीं ध्यातसे ॥२०॥
कृष्णाजिन वस्त्रेंसी वेष्टीलें वस्त्र कटीसी जटामुगुट शिरसी सूत्र आंगीं झळके ॥२१॥
पद्माक्ष तुलसी काष्ठ आवळा यांच्या माळा करी गळा कर्णीं शोभती कुंडला शिरीं धृत तुलसी ॥२२॥
वैकुंठी चर्चिली अंगा । द्वादश टिळे काढले चांगा बहुवेद तंत्रें वागां देहीं मुद्रा शोभती ॥२३॥
सहस्त्रादित्य संकश हास्यमुख अति सुरस आदि कारण ते वेदास प्रसाद सुचवी ॥२४॥
नाना शिष्य संभोवते विद्या पढती सर्वते विचारिती संशयातें त्यांसी सर्व विस्तारी ॥२५॥
तर्क मुद्रा वरदहस्त ब्रह्मादिक जेथें स्वस्त स्वानंद पतिध्यानस्थ एवं व्यासा नमोस्तुते ॥२६॥
ऐसे व्यास नारायण विश्‍वाचे गुरु निर्गुण त्यासी मी ध्यायिलें पूर्ण मागावया इच्छित ॥२७॥
श्रीगुरु तूं भक्तकाज मी मतिमंद नाहीं ओज काव्य करावया सहज तुमच्या कृपे इच्छितों ॥२८॥
तुमचें नाम नारायण नामा माजी श्रेष्ठ जाण सर्व पातकाचें हरण हेंचि नामें करुनी ॥२९॥
हेंचि मोक्षाचें साधन संन्यास्यासी मुख्य ध्यान सकळ ****चे निधान पुरुषार्थ येणेंचि ॥३०॥
जैसा वेदांत प्रणव जाण कीं अष्टादशा भागवत पुराण क्षेत्रीं जैसें आनंदवन देवांमाजी इंद्र जैसा ॥३१॥
वृक्षां मध्यें अश्‍वत्थ तुलसी व्रतामाजी एकादशी विष्णुपदी तीर्थांत जैसी तैसे अनुपम नारायण ॥३२॥
महीमा नारायण नामाचा सांगूं न शके ब्रह्मासाचा हे उच्चारिती जे वाचा आमुचा त्यांसी प्रणाम ॥३३॥
इह सद्गुरु पितृमातेसी साष्टांग करुनी त्यांसी वदतों परशुराम चरित्रासी भगवत्प्रसादें ॥३४॥
नाना पुराणाच्या कथेतें घेउनि करितों ईश **** भाविकांचीं आहेत मतें कथासुरस रचावया ॥३५॥
ईशभक्त कोणी एक श्रीकेशवात्मज शुक दांडेकरोप नामक दिव्यग्रंथ वदतसे ॥३६॥
शुक बैसला शाखेसी कवित्वाच्या अहिर्निशीं सकळ श्रोते संतासी नमोनी सर्वदा ॥३७॥
वेदाभ्यासी संन्यासी यती योगे‍श्‍वर ब्राह्मणासी सदा ध्याती श्रीहरीसी तया नमन करितों ॥३८॥
विनवीतसें समस्तांसी अल्पमती आपणासी माझे बोबडे बोलासी सकळ तुह्मी अंगीकारा ॥३९॥
कृपा करुनि पंडितांनीं मान्य करावें सुमनीं शुकाचे शब्द मानुनी ग्रंथ महिमा वाढवावा ॥४०॥
तावन्मात्र माझी मती नेणो काव्य व्युत्पत्ती जैसें गुरु निरोपिती तेणे परी सांगतों ॥४१॥
हें परशुराम चरित्र केलें अमृताचें सत्र तृप्त व्हा श्रोते पवित्र सावधान परिसिजे ॥४२॥
नमो नमो गुरुवर्या नमो नमो श्रीहरि पाया नमो नमोते कृपया मनोरथ पूरवी नमोस्तुते ॥४३॥
स्वस्ती श्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निः पाप होती नरु प्रथम नमनाध्याय गोड हा ॥१॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

सर्व पहा

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

लग्नानंतर पहिली मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या परंपरेमागचे धार्मिक कारण

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

श्रावणात बनवा उपवासाचे तोंडात टाकताच विरघळणारे नारळ आणि ड्रायफ्रूट लाडू

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments