रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (11:15 IST)

Holi 2021 हर्बल रंग तयार करण्याची सोपी विधी

होळीच्या दिवशी रंगाची उधळण करताना रंगांमुळे होणारे विपरित परिणाम याबद्दल आपण जास्त विचार करत नसला तर हे धोकादायक ठरु शकतं. अनेकदा रंगामुळे त्वचेचा आजार किंवा डोळ्यावर याचे प्रभाव दिसून येतात. अनेकांच्या त्वचेवरील रंग सोडवणे कठिण होऊन बसतं. अशात हर्बल कलर वापरणे कधीही योग्य. तर जाणून घ्या कशा प्रकारे तयार करता येतात हर्बल रंग- 
 
फुलांनी तयार करा रंग :
* पूर्वी होळीचे रंग टेसू किंवा पलाश फुले वापरुन तयार केले जात होते. त्याला गुलाल असे म्हणतात. टेसूच्या फुलांना भिजवून किंवा उकळून केशरी रंग तयार केला जातो. कोरडा रंग तयार करण्यासाठी याला वाळवून घ्यावे. आपण एरोरूट किंवा कणिक मिसळून रंग तयार करु शकता. केशराचे काही पाने पाण्यात मिसळून पेस्ट तयार करता येते. याने देखील केशरी रंग तयार होतो.
 
* गुलाबाचे पाने वाळवून याला वाटून यात चंदन पावडर, तांदळाचा आटा मिसळून देखील लाल रंगा तयार करता येतो. लाल रंग तयार करण्यासाठी हळद आणि बीट मिसळू शकता.
 
* झेंडूचे फुलं उकळून किंवा वाटून देखील पिवळा-नारंगी रंग तयार करता येऊ शकतो.
 
* निळा गुलाब, जकरांदाचे फुलं वाळून निळा रंग तयार करता येतो. या उकळून किंवा वाटून आपण ओला रंग देखील तयार करु शकता.
 
* बुरांसचे फुलं रात्रभर पाण्यात भिजवून लाल रंग तयार करता येतं, परंतू हे फुलं केवळ पर्वत क्षेत्रात आढळतात. पलिता, मदार आणि पांग्री मध्ये लाल रंगाचे फुलं लागतात. ही झाडे किनारी भागात आढळतात. फुलांना रात्रभर पाण्यात भिजवून सुंदर लाल रंग तयार करता येतो.
 
* गुलमोहरची वाळलेली पाने वाटून पावडर तयार करावी याप्रकारे हिरवा रंग वापरु शकता.
 
* जास्वंदीचे फुलं वाळून त्याची पावडर तयार करावी. अधिक प्रमाणात हवी असल्यास यात कणिक मिसळू शकता. सिन्दूरियाच्या बिया लाल रंगाच्या असतात, याने देखील आपण कोरडा किंवा ओला रंग तयार करु शकता.
 
बीटरूट वापरुन तया करा रंग : 
चुकंदर कापून किंवा कद्दूकस करुन यात अरारोट, मैदा किंवा तांदळाची पिठी मिसळून लाल रंग तयार करा. जांभाला रंग तयार करण्यासाठी चुकंदर वाटून मिश्रण गाळावे. काही वेळानंतर गडद जांभळा रंग तयार होईल.
 
डाळिंबाने तयार करा रंग : लाल रंग बनविण्यासाठी आपण डाळिंबाचे दाणे वापरु शकता. यासाठी डाळिंबाचे दाणे पाण्यात उकळून लाल रंग तयार होतो. यात चुकंदरचा रस देखील मिसळू शकता.
 
पालक आणि मेथीने तयार करा रंग : हिरवा रंग तयार करण्यासाठी पालक किंवा मेथी वापरु शकता. याला वाटून किंवा उकळून ओला रंग, आणि याची पेस्ट वाळवून अरारोट किंवा तांदळाच्या पिठासह पावडर असलेला कोरडा रंग तयार करता येऊ शकतो. आपण गव्हाच्या ज्वारीपासून हिरवा रंग तयार करु शकता. या व्यतिरिक्त पोंईच्या लहान-लहान फळांनी देखील रंग तयार करता येईल.
 
हळदीने तयार करा रंग : बेसन आणि हळदीने पिवळा रंग तयार केला जाऊ शकतो. पिवळा रंग तयार करण्यासाठी हळद सर्वात उत्तम आहे आणि त्वचेसाठी फायदेशीर देखील. आपण याने कोरडे आणि ओले दोन्ही रंग तयार करु शकतात. हवं असल्यास यात बेसन किंवा चंदन पावडर मिसळू शकता.
 
द्राक्षाने तयार करा रंग : काळा रंग तयार करण्यासाठी काळ्या द्राक्षांचा ज्यूस पाण्यात मिसळावा. या व्यतिरिक्त गडद किंवा तपकिरी रंग तयार करण्यासाठी हळदी पावडर आणि बेकिंग सोडा मिसळून रंग तयार येईल.
 
मेंदीने तयार करा रंग : 2 चमचे मेंदी एका लीटर पाण्यात मिसळून त्यात पालक, कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने मिसळून पेस्ट तयार करुन पाण्यात घोळून हिरवा रंग तयार करता येईल.
 
चंदनाने तयार करा : एक चिमूटभर चंदन पावडर एका लीटर पाण्यात भिजवल्याने नारंगी रंग तयार होतो. दोन लहान चमचे लाल चंदन पावडरला पाच लीटर पाण्यात टाकून उकळावे. यात वीस लीटर पाणी अजून घालावे. याने लाल रंग तयार होतो. यात डाळिंबांच्या सालींच्या रंग मिसळू शकता. कोरडं लाल चंदन आपण लाल गुलालप्रमाणे वापरु शकता. ही सुर्ख लाल रंगाची पावडर त्वचेसाठी उत्तम असते.