Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Holi 2021 हर्बल रंग तयार करण्याची सोपी विधी

Updated: रविवार, 28 मार्च 2021 (08:31 IST)
 
पालक आणि मेथीने तयार करा रंग : हिरवा रंग तयार करण्यासाठी पालक किंवा मेथी वापरु शकता. याला वाटून किंवा उकळून ओला रंग, आणि याची पेस्ट वाळवून अरारोट किंवा तांदळाच्या पिठासह पावडर असलेला कोरडा रंग तयार करता येऊ शकतो. आपण गव्हाच्या ज्वारीपासून हिरवा रंग तयार करु शकता. या व्यतिरिक्त पोंईच्या लहान-लहान फळांनी देखील रंग तयार करता येईल.
 
हळदीने तयार करा रंग : बेसन आणि हळदीने पिवळा रंग तयार केला जाऊ शकतो. पिवळा रंग तयार करण्यासाठी हळद सर्वात उत्तम आहे आणि त्वचेसाठी फायदेशीर देखील. आपण याने कोरडे आणि ओले दोन्ही रंग तयार करु शकतात. हवं असल्यास यात बेसन किंवा चंदन पावडर मिसळू शकता.
 
द्राक्षाने तयार करा रंग : काळा रंग तयार करण्यासाठी काळ्या द्राक्षांचा ज्यूस पाण्यात मिसळावा. या व्यतिरिक्त गडद किंवा तपकिरी रंग तयार करण्यासाठी हळदी पावडर आणि बेकिंग सोडा मिसळून रंग तयार येईल.
 
मेंदीने तयार करा रंग : 2 चमचे मेंदी एका लीटर पाण्यात मिसळून त्यात पालक, कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने मिसळून पेस्ट तयार करुन पाण्यात घोळून हिरवा रंग तयार करता येईल.
 
चंदनाने तयार करा : एक चिमूटभर चंदन पावडर एका लीटर पाण्यात भिजवल्याने नारंगी रंग तयार होतो. दोन लहान चमचे लाल चंदन पावडरला पाच लीटर पाण्यात टाकून उकळावे. यात वीस लीटर पाणी अजून घालावे. याने लाल रंग तयार होतो. यात डाळिंबांच्या सालींच्या रंग मिसळू शकता. कोरडं लाल चंदन आपण लाल गुलालप्रमाणे वापरु शकता. ही सुर्ख लाल रंगाची पावडर त्वचेसाठी उत्तम असते.

सर्व पहा

मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा! माटुंगा जीएसबी सेवा मंडळाचे ₹७०३.२७ कोटींचे विक्रमी विमा संरक्षण

जन्माष्टमी असो वा विकेंड; मन प्रसन्न करण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' इस्कॉन मंदिरांना नक्की भेट द्या!

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

Happy Janmashtami Images श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी फोटो

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments