मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

'द अमेजिंग स्पायडरमॅन'चे ट्रेलर

स्पायडरमॅनला पसंत करणाऱ्या लोकांना हे ऐकून फारच आनंद होईल की त्यांचा आवडत्या सुपरहीरोचे चित्रपट ‘द अमेजिंग स्पायडर-मॅन’ 3 जुलै 2012ला रिलीज होणार आहे. मार्क वेब द्वारे दिग्दर्शित हे चित्रपट थ्री-डीमध्ये असणार आहे. चित्रपटात एंड्रयू गारफील्ड आणि एम्मा स्टोनने लीड रोल केले आहे. या चित्रपटाच्या सीक्वलची प्लॅनिंग देखील झाली आहे जे 2014मध्ये रिलीज होणार आहे.

यंदा पीटर पार्कर आपल्या अतीतच्या रहस्यातून पडदा उघडण्याचा प्रयत्न करणार आहे की तो स्पायडरमॅन का बनला. चित्रपटात भारतीय कलाकार इरफान खानपण डॉक्टर राथाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘इन ट्रीटमेंट’ नावाच्या टीव्ही सीरिजमध्ये इरफानचा अभिनय मार्क वेबला पसंत पडला आणि त्याने इरफानशी संपर्क करून सांगितले की त्याचा बरोबर त्याला चित्रपट करायचे आहे.

इरफानची फारशी इच्छा नव्हती, पण जेव्हा ही बाब त्याच्या मुलांपर्यंत गेली तेव्हा त्यांनी इरफानवर दाब टाकले आणि म्हणाले की त्याने स्पायडरमॅन चित्रपटात जरूर काम केले पाहिजे.