1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
  4. A forest fire in Los Angeles California USA

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली
Hollywood News: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आगीने निवासी भागातही कहर केला आहे. तसेच वणव्याची झळ हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत, प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहे. लॉस एंजेलिस प्रशासनाने संपूर्ण शहरात आणीबाणी लागू केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे सुमारे 1900 इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहे आणि 28 हजार घरांचे नुकसान झाले आहे. लॉस एंजेलिसच्या पॉश पॅलिसेड्स भागात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींची घरेही आगीत जळून खाक झाली आहे.पॅरिस हिल्टन, स्टीवन स्पीलबर्ग, मॅंडी मूर, अ‍ॅश्टन कुचर, अ‍ॅना फारिस, हेईडी मोटांग यांच्यासह अनेक हॉलिवूड स्टार्सची घरे जळून खाक झाली आहे. आगीमुळे दोन चित्रपटांचे प्रीमियरही रद्द करण्यात आले आहे. क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स आणि ऑस्कर नामांकने पुढे ढकलण्यात आली आहे.

Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी