शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (15:18 IST)

आईने सांगितलेला एक जोक ऐकून मुलगी कोमातून बाहेर!

जोक ऐकून कोणालाही हसूच येते.आई आणि मुलाचं नातं हे वेगळंच आहे. आई आपल्या मुलांचा नेहमी जवळची असते. आपल्या मुलाला काहीही त्रास होत असल्यास आईला लगेच समजते. मुलांची सांकेतिक भाषा आई ओळखते. मुलं आजारी असल्यास आई आपले सर्वस्व पणाला लावते. अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे 5 वर्षांपासून कोमात गेलेली मुलगी  आईच्या एका जोक मुळे जग्गी झाली आणि तिने हसत हसत डोळे उघडले. हे पाहून डॉक्टर देखील चकित झाले. 
 
सदर प्रकरण आहे अमेरिकेतील मिशिगन मध्ये राहणारी जेनिफर फ्लेव्हन ही महिला 5 वर्षांपूर्वी रोड अपघातात गंभीर जखमी झाली तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर ती कोमात गेली डॉक्टरांनी तिला शुद्धीवर आणण्याचे खूप प्रयत्न केले. तरीही ती शुद्धीवर आली  नाही.मात्र 5 वर्ष नंतर 25 ऑगस्ट 2022 रोजी तिने चक्क डोळे उघडले. जेनिफरच्या आईने तिला एक जोक ऐकवले. जोक ऐकतातच जेनिफरने डोळे उघडले आणि ती बेडवर चक्क उठून बसली. ही घटना जेनिफरच्या आईने पेगी मीन्स ने सांगितली.

ती म्हणाली जोक ऐकल्यावर जेनिफर  चक्क उठून बसली या पूर्वी तिने असं कधीही केलं नव्हत. जेनिफरच्या आईने सांगितले की सुरुवातीला जेनिफर जागी झाली होती पण पूर्णपणे शुद्धीत न्हवती. तिला काहीच बोलता येत नव्हते पण मान हलवत होती. सुरुवातीचे काही दिवस ती झोपेत असायची नंतर ती जास्त काळ जागू लागली.
डॉक्टरांना हे पशूं आश्चर्यच झाले. ते म्हणाले ही घटना खूपच दुर्मिळ आहे. फार कमी लोक कोमातून बाहेर येतात.जेनिफर त्यात वेगळी आहे.हा एक चमत्कारच आहे.  
 
 Edited by - Priya Dixit