रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (15:36 IST)

सुपर हिरोचा किमयागार काळाच्या पडद्याआड

लहान मुलांपासून ते मोठ्या मानसांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या सुपहिरोजची निर्मिती करणारे स्टेन ली मार्टिन लाईबर यांचे सोमवारी निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. स्टेन ली हे मार्व्हल निर्माता कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी निर्मित केलेले ब्लॅक पँथर, स्पाइडर-मॅन, द फॅन्स्टॅस्टिक फोर आणि एक्स मॅन सारख्या चित्रपटाने जगभरातील लोकांचे मनोरंजन केले. याच बरोबर स्टेन ली हे एक लेखक, अभिनेता, प्रकाशक आणि संपदाक ही होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांची मुलगी जोन सेलिआ ली यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. 
 
स्टेन ली यांनी १९३९ मध्ये सुपर हिरोजवर आधारित कार्टून कॉमिक्स बनवले. ब्लॅक पॅंथर, स्पायडर-मॅन, द एक्स-मेन, द माईटी थोर, आयरन मॅन, द फॅन्टेस्टिक फोर, द इंक्रेडिबल हल्क, डेअरडेव्हिल्स आणि एंट-मॅन ही पात्र त्यांनी निर्माण केलीत. स्टेन ली यांचे नाव अगोदर फक्त ली होते. मात्र कॉमिक निर्मीतीसाठी त्यांनी आपले नाव बदलून स्टेन ली ठेवले. त्यांनी फक्त सुपरहिरोज निर्माण केले नाहीत तर त्यांच्यावर आधारित चित्रपटांचीही निर्मीती केली. या चित्रपटांमध्ये त्यांनीही काम केले. स्पायडर-मॅन हा त्यांनी निर्माण केलेला पहिला पात्र आहे.