मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: सोमवार, 9 जुलै 2018 (15:26 IST)

जस्‍टिन बीबरचा झाला साखरपुडा

हॉलिवूड सिंगर जस्‍टिन बीबरने आधी ब्रेकअप नंतर पॅचअप आणि आता साखरपुडा केल्‍याने तो पुन्‍हा चर्चेत आला आहे.  जस्टिन बीबरने अमेरिकची प्रसिध्‍द मॉडेल हेली बाल्डविनशी साखरपुडा केल्‍याचे वृत्त आहे.  
 
एका परदेशी वेबसाईटच्‍यानुसार, जस्टिन बीबर आणि हेली बाल्डविनने बहामासच्‍या एका लोकल रेस्टॉरेंटमध्‍ये ७ जुलैला साखरपुडा केला आहे. २४ वर्षीय जस्टिन बीबर हेलीला २०१६ पासून डेट करत होता. दरम्‍यान, दोघांमध्‍ये ब्रेकअप झाल्‍याचेही वृत्त होते. परंतु, त्‍यानंतर दोघांची जवळीक वाढलेली दिसली. बीबर-हेली बहामास येथे सुट्‍टी एन्‍जॉय करण्‍यासाठी गेले होते. या दरम्‍यान, बीबरने एका रेस्टॉरंटमध्‍ये हेली बाल्डविनला लग्‍नासाठी प्रपोज केले आणि साखरपुडा केला.