गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (18:49 IST)

हॉलिवूड अभिनेता जॉनी व्हॅक्टरची मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली

Johnny wactor
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे दरोड्याच्या प्रयत्नादरम्यान जनरल हॉस्पिटल फेम जॉनी वेक्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी, 25 मे रोजी, अभिनेत्याला चोरांनी गोळ्या घातल्या. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, चोरीचा प्रयत्न करत असताना त्यांना गोळी लागली होती
 
 शनिवारी पहाटे 3 वाजता चोरांनी त्याच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आईने सांगितले की अभिनेत्याने चोरांशी लढण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु त्यांनी पळून जाण्यापूर्वी जॉनीला गोळ्या घातल्या. यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Edited by - Priya Dixit