महिलेवर बलात्कार तर इतर तिघींवर लैंगिक अत्याचार; हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडला साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
हॉलिवूड अभिनेता आणि विनोदी कलाकार रसेल ब्रँडला साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २० वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात त्याला दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाने त्याला 'लैंगिक शिकारी' म्हटले आहे.
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता, विनोदी कलाकार आणि माजी निवेदक रसेल ब्रँडला बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने सोमवारी या प्रकरणांची सुनावणी करून शिक्षा सुनावली. सुमारे २० वर्षे जुन्या प्रकरणांमध्ये रसेल ब्रँडला दोषी ठरवण्यात आले आहे. एका महिलेवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार तसेच इतर तिघींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने त्याला 'लैंगिक शिकारी' म्हटले आणि साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या बातमीमुळे पाश्चात्य मनोरंजन उद्योगात खळबळ उडाली आहे. रसेलवर आपल्या सेलिब्रिटी पदाचा गैरवापर करून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

