शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , सोमवार, 15 मे 2017 (12:42 IST)

मायकल जॅक्सनच्या मुलीचा पुन्हा अर्धनग्न फोटो

अमेरिकन मॉडेल आणि दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सन याची एकुलती एक मुलगी पेरिस जॅक्सन सध्या वादात अडकली आहे. आपल्या 14 लाख फॉलोअर्सना दिलेल्या एका मॅसेजमुळे पेरिस सध्या चर्चेत आहे. 'नग्नता ही नैसर्गिक आहे आणि आपण मनुष्यप्राणी त्याच निसर्गाचा एक भाग आहोत', असे तिने म्हटले आहे. 
 
18 वर्षाच्या पेरिसने इंस्टाग्रामवरील अकाउंटवर आपला एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला ती उन्हात टॉपलेस बसलेली होती आणि बाजूला तिचा कुत्राही होता. या फोटोवरून तिच्यावर खूप टीका झाली आणि वादाला तोंड फुटले. पेरिसने या फोटोत इमोजीचा वापर करत आले स्तन झाकले. पण वाद उफाळल्यानंतर तिने हा फोटो डिलिट केला. आता पुन्हा पेरिसने असाच काहीसा फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट आहे. यात ती टॉपलेस होऊन सिगारेट ओढताना दिसत आहे.