1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

ट्विटरची महाराणी, लेडी गागा

WD

प्रसिद्ध पॉप गायिका लेडी गागाचे ट्विटरवर तब्‍बल 1.8 कोटी चाहते असून तिने ट्विटरच्‍या जगात नवीन इतिहास रचला आहे. लेडी गागा जगातील पहिलीच सेलिब्रिटी बनली आहे.

वेबसाईट 'कॉन्‍टॅक्‍ट म्‍युझिक डॉट कॉम'नुसार, गागाने वयाच्‍या अवघ्‍या 25व्‍या वर्षीच गायिका जस्टिन बीबरला मागे टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच जस्टिनचे 1.60 कोटी चाहते असल्‍याची घोषणा करण्‍यात आली होती. ऑनलाईन जगतातील चाहत्‍यांचा निकष लावल्‍यास जस्टिन सर्वात पुढे होती.

परंतु, गागाने सोमवारी ट्विटवरवर पोस्‍ट केले की, 'ट्विटरवर माझे 1.8 कोटी चाहते आहेत यावर माझाच विश्‍वास बसत नाही.' सध्‍या गागाचे 1,81,33,842 चाहते आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा