Dharma Sangrah

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Essay on Independence Day in Marathi

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (13:08 IST)
स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांचा नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वतंत्र हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी म्हणतात 'पराधीन सपनेहुं सुखनाहीं' म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नात देखील सुख नसतं. गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते.
 
आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे. आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा देखील प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे.
 
भारतवर्षातील महान संविधानाचे लेखक बाबा साहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांनी संविधानात भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रेची ओळख करून दिली आहे तसेच त्यांना विशेष अधिकार देखील दिले आहे. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या समृद्धीच्या उंचावर पोहोचला आहे.
 
आज संपूर्ण जगात भारत आशेची किरण बनून सूर्यासम आकाशात चमकत आहे, हे सर्व स्वातंत्र्य भारतात शक्य आहे. पण आम्हाला हे स्वातंत्र्य सहजच मिळाले नाही, या साठी देशातील शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले आहे. आम्हाला त्याचे नेहमीच आभार मानायला हवे.
 
आज आपण या स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, हे आपल्याला भारतमाताच्या वीर सपूतांची आठवण करून देते ज्यांनी आपल्या स्वतःला पूर्णपणे या देशासाठी अर्पण केले होते. भारतातील प्रख्यात विद्वान, कवी, इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक उन्नती करून भारताच्या स्वातंत्र्यात चार पट वाढ केली.
 
आज भारत संपूर्ण जगात अविश्वसनीय आहे. सामाजिक कुरीती नाहीश्या झाल्या, गरिबांचे आर्थिक शोषण संपले आणि खेड्या गावांच्या स्थितीमध्ये देखील सुधारणा झाली. आज भारतासमवेत संपूर्ण जग दहशतवाद्यांशी झुंज देतं आहे. हे स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वात मोठा डाग आहे.
 
हे तर आपणा सर्वांना ठाऊक आहे की दहशतवादाला काहीच धर्म नसे. काही लोकं दहशवादाच्या नावाखाली अनेक निर्दोष लोकांना ठार मारतात, देशाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. याचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये सरकारी धोरण आणि देशाच्या संरक्षण यंत्रणेबद्दल संभ्रम होत. आपल्या सर्वांना हवं की या दहशतवादाच्या विरुद्ध एकमताने आणि एकत्रितपणे मिळून सरकारला सहयोग करावं.
 
खरं तर हे आमचे सौभाग्याचं आहे की आम्ही या भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. काही लोकं निव्वळ स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या देशाला भ्रष्टाचारात व्यापून देशातील भोळी भाबडी जनतेला दिशाभूल करीत आहे. आपल्याला एकत्र होऊन अश्या भ्रष्ट लोकांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि या भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन लवकरात लवकर केले पाहिजे.
 
भारतवर्षाला पूर्वी सारखे सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजायचा आहे, प्रत्येक भारतीयाला आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवं, तरच आपले देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. हेच आमचे उद्दिष्ट आहे.
 
भारत मातेचा विजय असो, आम्ही सर्व एक आहोत, वंदे मातरम्.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यरची भारताचा टी२० कर्णधारपदी निवड

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतीय वरिष्ठ संघाकडून टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणार

LIVE: छगन भुजबल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची छगन भुजबळ यांनी भेट घेतली

जून महिन्यात ह्युंदाई क्रेटा, वारणा आणि i20 वर किती सूट देत आहे? नवीनतम तपशील येथे तपासा

पुढील लेख
Show comments