महाराणा प्रताप जयंती2021 विशेष :पराक्रमी राजा महाराणा प्रताप
महान योद्धे शौर्यवीर महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड दुर्ग (पाली) येथे महाराज उदयसिंह आणि आई माता राणी जीवत कवर यांचा कडे झाला.महाराणांना लहानपणी कीका म्हणायचे. महाराणा प्रताप हे गुहिलोत या नावाने राजस्थानात प्रख्यात आहे.
महाराजा उदयसिंह ने आपल्या लाडक्या मुलाला जगमल याला वारस म्हणून राजगादी वर नेमले परंतु महाराणा प्रताप यांचा मामाने जगमल ला राजगादी वर न बसू देता इतर सरदारांच्या मदतीने महाराणा प्रताप यांना राज गादीवर बसवले.
महाराणांना अकबराचे स्वामित्व स्वीकार नव्हते त्यामुळे त्यांना मोगलांशी युद्ध करावे लागायचे.हल्दीघाटीच्या युद्धात महाराणांचे पराभव झाले.तरीही त्यांनी मोगलांशी युद्ध सुरूच ठेवले.आणि आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळवले.
महाराणांकडे चेतक नावाचा एक घोडा होता.तो त्यांना खूप प्रिय होता.
शिकार करताना महाराणांना दुखापत झाली त्या मधून ते सावरू शकले नाही नाही वयाच्या 57 वा वर्षी 19 जानेवारी 1597 रोजी त्यांने जगाचा निरोप घेतला.