गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: रविवार, 13 जून 2021 (08:00 IST)

काजवे का चमकतात जाणून घ्या

रात्री घराभोवती काजवे उडताना बघितलेच असणार ते उडताना चमकतात आणि खूप सुंदर दिसतात.परंतु हे चमकतात कसे काय हे माहित आहे का ? चला तर मग जाणून घेऊ या.
वास्तविक काजवे अन्नाच्या शोधात किंवा आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चमकतात.काजव्यांच्या शरीरातील मागील भागास प्रकाश जळत असतो,हा प्रकाश त्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेमुळे उद्भवतो .
या रासायनिक क्रियेत 'ल्युसिफेरस' आणि 'ल्युसिफेरीन' नावाचं प्रोटीन बनतं हे प्रोटीन ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर प्रकाश उत्पन्न करतात.काजव्यासह अनेक जीव असे आहेत ज्यांच्यामध्ये प्रकाश उत्पन्न करण्याचे गुणधर्म आहेत.काजवे हे आपल्या वातावरणात सहजरित्या आढळतात म्हणून काजवे प्रकाश उत्पन्न करणाऱ्या जीवांमध्ये प्रख्यात आहे.