मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 22 जून 2023 (22:47 IST)

नाभीत तेल घालण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या.

शरीराचा प्रत्येक भाग खूप महत्वाचा आहे आणि त्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. आपण आपल्या शरीराला मॉइश्चरायझ करण्यासाठी क्रीम लावतो .काहीच वेळाने त्वचा पुन्हा रुक्ष होते.परंतु आपणास माहितीत आहे की नाभीत तेल लावल्याने चेहऱ्याची चमक तशीच राहते मग ते स्त्री असो किंवा पुरुष.
चला तर मग नाभीत तेल लावण्याचे 5 फायदे जाणून घेऊ या.
 
1 जर आपल्याला डोळ्यांशी निगडित काही समस्या जाणवत असतील तर आपण आपल्या नाभीवर नारळाचे तेल लावावे. यामुळे डोळ्याची दृष्टी चांगली राहील.
 
2 नाभीवर बदाम तेल लावल्याने मुरूम नाहीसे होतात आणि चेहर्‍याची चमक देखील तशीच राहते.
 
3 आजच्या काळात, विशेषत: स्त्रियांमध्ये, गुडघेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. अशा परिस्थितीत नाभीवर मोहरीचे तेल लावल्याने सांधे व गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो.
 
4 स्त्रिया आणि पुरुष नेहमीच केस गळतीच्या समस्येने त्रस्त असतात. मोहरीचे तेल नियमितपणे नाभीवर लावा आणि मालिश करत रहा. या मुळे हे आपले केस गळणे कमी होईल आणि आपले केस अधिक मजबूत होतील.
 
5 नारळ तेल अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले गुणधर्म प्रजनन शक्ती वाढविण्यात मदत करतात.