सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2023 (18:03 IST)

Benefits of Hot Bath गरम पाण्याने अंघोळ करण्याचे 5 फायदे

bath
थंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट पाण्याने अंघोळ करण्याचे काही फायदेही आहेत. जाणून घ्या 5 फायदे:
 
* गरम पाणी शरीरात उष्णता पैदा करतं आणि आपल्याला थंडीपासून वाचवतं. याने थंडीत शरीराला होणार्‍या दुष्प्रभावापासून रक्षा होते.
 
* थंडीत रक्त प्रवाह सुरळीत ठेवून आपल्या सक्रिय राहण्यासाठी कोमट पाण्याचे स्नान मदतगार सिद्ध होतं. याने त्वचा संक्रमणापासूनही बचाव होतो.
 
* थंडीत होणारे इतर आजार जसे सर्दी, खोकला, ताप यापासून बचावासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त झोप न येण्याच्या समस्येपासून बचावासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर आहे.
 
* श्वासासंबंधी आजार असणार्‍यांना थंडीत सतर्क राहण्याची गरज आहे. अशात त्यांनी गरम पाण्यात करणे फायदेशीर ठरू शकेल ज्याने श्वासासंबंधी समस्या वाढू नये.
 
* थंडीत शरीरात होत असलेल्या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे खूप प्रभावी उपाय आहे. याने मानसिक रूपानेही रिलॅक्स फील होतं.