सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (21:22 IST)

पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला, नवी तारीख जाहीर जाणून घ्या

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक बॅडन्यूज आहे. कारण आता पावसाची आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. अजूनही महाराष्ट्रात पाऊस आला नाही. अल निनो आणि चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे मान्सूनची वाट अजून पाहावी लागणार आहे. 10 जूनपर्यंत तो जरी केरळ आणि तळकोकणात आल्याचं सांगितलं जात असलं तरी पाऊस मात्र गायब झाला आहे. त्यामुळे बळीराजा देखील चिंतेत आहे. अजून पेरणी थांबली आहे, पाऊस नसेल तर भातशेतीचं नुकसान होईल याची चिंता आहे.
दरम्यान मान्सून 27 जूनपर्यंत येईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला असून 23 जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज आहे.
मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे 15 जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला असून, आता 23 जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये
23 जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मोसमी पाऊस सुरू होण्यास पोषक वा तावरण तयार होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor