मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जांभूळ खाल्यावर काय खाऊ नये?

जांभूळ खाल्यावर काय खाऊ नये?black currant benefits in marathi
जांभूळ हे त्या हंगामी फळांपैकी एक आहे, जे पावसाळ्यात भरपूर प्रमाणात मिळते. हे केवळ स्वादिष्ट नसून आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते. यात अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम आणि आयर्नचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवता येते. जांभूळ  हे मधुमेहावर रामबाण औषध मानले जाते. त्यात मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत, जे मधुमेहाच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहित आहे का की गुणधर्मांनी भरलेली जांभळं खाल्ल्यानंतर लगेच काही गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. होय अशा 3 गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या जांभूळ खाल्ल्यानंतर टाळल्या पाहिजेत.
 
दूध -  जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळावे. जांभूळ खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केल्याने पोटदुखी, अपचन, गॅस, अॅसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला दूध प्यायचे असेल तर तुम्ही जांभूळ खाल्ल्यानंतर एक ते दोन तासांनी ते पिऊ शकता. दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नका.
 
लोणचे - लोणचे जांभूळ सोबत किंवा जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच सेवन करु नये. यामुळे घसा खवखवणे किंवा पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला लोणचे खायचे असेल तर जांभूळ खाल्ल्यानंतर किमान एक तासाने लोणचे खाऊ शकता.
 
हळद - जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच हळद किंवा हळद असलेली कोणतीही गोष्ट खाऊ नये. यामुळे पोटदुखी किंवा जळजळ होण्याच्या तक्रारी होऊ शकतात. जांभूळ खाल्ल्यानंतर अर्धा किंवा एक तासानंतर तुम्ही हळद किंवा हळद असलेली एखादी वस्तू खाऊ शकता.
 
जांभूळ खाण्याचे फायदे जाणून घ्या - 
1. जांभूळ शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते.
2. जांभूळ हे मधुमेहासाठी प्रभावी फळ मानले जाते.
3. जांभूळ हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
4. जांभूळ उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम देते.
5. हिरड्या आणि दातांसाठी जांभूळ खूप फायदेशीर आहेत.
6. जांभूळ खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती सुधारते.
7. वजन कमी करण्यासाठी जांभूळ हा एक उत्तम पर्याय आहे.
8. जांभूळाचे सेवन केल्याने मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो