1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (11:00 IST)

सावट अजूनही निराशेचे

independence day 2020
सावट अजूनही निराशेचे,
दिसले न किरण अजून आशेचे,
दिवस उगवतो, अन मावळतोही,
पण भीती मनातली जराही जात नाही,
असं किती दिवस? ह्याचे उत्तर नाही ठावे!
घाबरत घाबरत किती दिवस ते काढावे?
यावा तो ही दिवस, मोकळ्या श्वासाचा,
विषाणू मुक्त सर्वांनी जगण्याचा,
मिळेल स्वातंत्र्य आशा मुस्कट दाबातून,
हसतील बागा पुन्हा मुलांच्या किलबिलाटातुन!
तो दिवस असेल खऱ्या स्वातंत्र्याचा,
विषाणूंमुक्त मोकळा श्वास घेण्याचा!
...अश्विनी थत्ते