ND स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच, या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान देशभक्त बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी तालुक्यातील चिखली या खेडेगावांत झाला. त्यांचे वडील पंडित गंगाधर टिळक विद्वान शिक्षक होते. टिळकांच्या लहान वयातच वडिलांचे...