मजसी ने परत मातृभूमीला
- विनायक दामोदर सावरकर
ने मजसी ने परत मातृभूमीलासागरा प्राण तळमळला ॥धृ॥भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।मी नित्य पाहिला होता ॥मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।सृष्टिची विविधता पाहूं ॥तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।परि तुवां वचन तिज दिधले ॥मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।त्वरित या परत आणिन ॥विश्वसलो या तव वचनीं । मीजगदनुभवयोगें बनुनी ॥ मीतव अधिक शक्त उद्धरणीं । मीयेइन त्वरे, कथुन सोडिले तिजलासागरा प्राण तळमळला ॥ १ ॥शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।ही फसगत झाली तैशी ॥भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।दशदिशा तमोमय होती ॥गुणसुमनें मी वेचियली या भावें ।की तिने सुगंधा घ्यावें ॥जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।हा व्यर्थ भार विद्येचा ॥ती आम्रवृक्षवत्सलता । रेनवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥तो बाल गुलाबहि आतां ॥ रेफुलबाग मला, हाय पारखा झाला ।सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥