मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. धोका चिनी ड्रॅगनचा
Written By वेबदुनिया|

अशी आहेत चीनमधील शहरं

स्वाती फलटणकर

भारतात किती शहरं आहेत? मुंबई कोठे येते, दिल्लीत काय आहे. या साऱ्यांची माहिती देशातीलच नाही तर जगातील अनेकांना आहे. भारताने कधीही आपल्या शहरांची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु फार क्वचित लोकांना चीन मधील शहरांची नावंही माहिती असतील.

चीनमध्ये आलेल्या प्रत्येक सत्ताधाऱ्याने देशातील महत्त्वाची माहिती, शहरांची माहिती दडपण्याचा प्रयत्न केला. परकीय आक्रमणांमुळे कदाचित सत्ताधीशांनी हा निर्णय घेतला असावा.

परंतु आता व्यापाराच्या निमित्ताने का होईना चीनच्या स्वातंत्र्यानंतर 21 व्या शतकात देशातील महत्त्वाची शहरं आणि त्यांविषयीची माहिती प्रकाशात येत आहे.

चीनमध्ये 668 शहरं आहेत. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून चीनचा पहिला क्रमांक लागतो. यातील 13 शहरांतील लोकसंख्या ही दोन कोटींवर आहे.24 शहरं अशी आहेत की यात एक कोटी लोकं राहतात. 48 शहरांची 50 लाख ते एक कोटींपर्यंत लोकसंख्या आहे. 205 शहरात वीस लाखांवर लोक वास्तव्याला आहेत. आणि 378 शहरं अशी आहेत की ज्यांमध्ये वीस लाखांपेक्षा कमी नागरिक वास्तव्य करतात.

बीजिंग
बीजिंग ही चीनची राजधानी. बिजींग महानगरपालिकेवर प्रत्यक्ष केंद्र सरकारने नियंत्रण आहे. बीजिंग चीनचे अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. या शहराला , राजकीय, सांस्कृतिक, आणि शैक्षणिक वारसा लाभला आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही हे शहर महत्त्वाचे असून, चीनचे संरक्षण विषयक आणि परराष्ट्रीय धोरणांसंबंधीचे निर्णय याच शहरातून घेतले जातात.

चीनमध्ये अनेक राजसत्ता अस्तित्वात आल्या. या काळातही चीनची राजधानी म्हणून त्यांनी याच शहराची निवड केली होती. नुकतेच झालेले ऑलिंपिकही याच शहरात भरवण्यात आले होते.

या शहरात चार विविध प्रकारचे ऋतू आपल्याला पाहायला मिळतात, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा आणि आपल्याकडील ऑक्टोबर हिट प्रमाणे पाऊस आणि कधी ऊन.

शरद ऋतूमध्ये बीजिंगमध्ये राहण्याची मजा काही औरच असते. 11 व्या शतकात झोउ राजसत्ता असताना बीजिंग शहर खऱ्या अर्थाने प्रथम नावारूपाला आले.बीजिंगमध्ये राजसत्ता आपल्या अस्तित्वासाठी लढत असताना यान शासनाच्या कालावधीत बीजिंग जी नावाने ओळखले जात. यापुढील काळात तर बीजिंगचे महत्त्व उत्तरोत्तर वाढतच गेले.

लियाओ, मिंग, युआन, या महान चिनी सत्ताधीशांच्या काळातही बिजींग या शासकांची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात.जगातील सर्वात मोठे शहर, त्यानआनमेन चौक, द ग्रेट चायना वॉल, समर पॅलेस, शाही गार्डन, शाही मकबरा, मिंग स्मशान, हे सारे बीजिंगमध्ये किंवा परिसरातच असल्याने हे शहर चीनसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मिंग शासकाच्या काळातील विविध वास्तूशिल्प आजही बिजींगमध्ये जपून ठेवले आहेत.

1949 नंतर खऱ्या अर्थाने बीजिंग शहराच्या विकासास सुरुवात झाली. 1980 नंतर शहराच्या औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शहरात 200 पेक्षा अधिक स्टार दर्जाची हॉटेल्स आहेत. मॉल्स आणि 200 उड्डणपूल, आज शहरात अनेक गगनचुंबी इमारती उभ्या ठाकल्याने बीजिंग भव्य-दिव्य दिसते.

शहराची रचना अत्यंत रेखीव आहे. शहरात भल्या मोठ्या उंच इमारती असल्या तरी त्या रेखीव आणि आकर्षक असल्याने शहर भरगच्च न वाटता ते सुंदर दिसते.

शांघाय
शांघायी म्हणजे हार्ट ऑफ चीन. या शहरात चीनच्या यशस्वी अर्थव्यवस्थेचे गुपित दडले आहे. या शहरालाही वारसा लाभला आहे. या शहराजवळच यांगत्से नदी समुद्राला येऊन मिळत असल्याने आणि समुद्रा किनारा असल्याने या शहरातून चीन मधील उद्योगांचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या शहरावर प्रत्यक्ष केंद्र सरकारचे नियंत्रण आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत शांघाईची महत्त्वाची भूमिका आहे. मेटालर्जी, मशीन्स, शिपींग्स, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल्स या क्षेत्रातील अनेक उद्योग या शहरात आहेत. बँकिंग आणि शिपींग क्षेत्रातील उद्योगांनीही या शहरात आता आपला विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.

शहरापासून जवळच आता पुडॉंग नावाचा भाग विकसीत झाला आहे हॉंगपू नदीच्या जवळच हे सुंदर शहर विकसीत झाले असून, शांघाईचे नाव आंतरराष्ट्रीय आधुनिक शहर म्हणून विकसीत करण्यात पुडॉंगचा महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी अनेकदा महाराष्ट्राचे शांघाय करू असे स्वप्न महाराष्ट्रीयन जनतेला दाखवले. शांघाईचं महत्त्व आणि येथील विकसीत उद्योगांचा अंदाजा आपल्याला यावरूनच येईल.

तायजेन
तायजेन शहर चीनमधील अवजड उद्योगांसाठी महत्त्वाचे आहे. शांघाय पाठोपाठ चीनच्या अर्थव्यवस्थेत या शहरातील उद्योगांचा महत्त्वाचा वाटा आहे. राजधानी बीजिंग पासून 120 किलोमीटर अंतरावर हे शहर आहे.

शहरात स्टील आणि आयर्न उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. तानजेनलाही समुद्र किनारा लाभल्याने चीनमधील निर्यातीसाठी हे शहर महत्त्वाचे मानले जाते. एटोमोबाईल, टेक्सटाईल्स, पेट्रोलियम, इतकेच काय तर चायनीच घडाळ्यं आणि टीव्ही तयार करणारे उद्योगही या शहरातच आहेत.

चॉंग्क्वींग शहर
चीनच्या दक्षिण पश्चिम भागात चॉग्क्वींग शहर आहे. चिनी व्यापाऱ्यांचे हे आवडते शहर. या शहरावरही केंद्र सरकारचे प्रत्यक्ष नियंत्रण आहे. यांगत्से व्हॅलीच्या जवळच हे शहर वसल्याने या भागात ट्रोंर्स्पोस्ट्रेशनचा मोठा व्यवसाय आहे. यांगत्से आणि जायलिंग नदी या शहरापासूनच वाहते. या शहराला निसर्गाचाही वरदहस्त लाभला आहे. पेनीसुएला प्रमाणे या शहराला ‘पर्वतांचे शह’ म्हणूनही ओळखले जाते. 1997 पासून चीन सरकारने या शहराच्या औद्योगिक विकासास सुरुवात केली.

चीनकडील दक्षिण पश्चिम भागाचा विकास करणे हेच या मागचे एकमेव उद्दिष्ट होते. चीन सरकारने आखलेल्या धोरणांप्रमाणे आणि योजनांमुळे बीजिंग, शांघाय पाठोपाठ या शहरातही अनेक उद्योग फोफावले आहेत. याच शहरात सरकारने जलशुद्धीकरण आणि पर्यावरण संरक्षणाचा एक प्रकल्पही सुरू केला आहे.

गुआंगज
गुआंगजौ शहर दक्षिण चीनमधील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शहर आहे. गुआंगजौ चीनमधील सर्वात जुने व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. चीनच्या इतिहासात डोकावल्यास आपल्याला या शहराचा उल्लेख आढळतो.

हे शहरं व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून जितके महत्त्वाचे आहे, तितकेच चीनमधील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणूनही हे शहर महत्त्वाचे मानले जाते.

शीआन
शानक्सी प्रांताची राजधानी म्हणजे शीआन हे शहर. चीनच्या उत्तर पश्चिमेकडील भागातील हे महत्त्वाचे शहर आहे. या चांग आन अशा नावानेही हे शहर ओळखले जाते.

कधीकाळी हे शहर चीनमधील अनेक शासकांची राजधानी म्हणून ओळखले जात. या शहराला मोठ्या प्रमाणात वारसाही लाभला आहे. या भागात चीन सरकारने केलेल्या उत्खननात किंग शी हुआन या राजाचे प्राचीन अवशेष सापडले आहेत.

या शहराला अनेक दाखले असल्याने आणि तितकेच महत्त्व असल्याने चीनमधील पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून शहराला ओळखले जाते. चीन सरकारने आता शहरात पर्यटनाच्या विकासासह उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्याने शहरातील उद्योगांचे प्रमाण वाढत आहे.

वुहान

हुबेई प्रांताची राजधानी म्हणून वुहान हे शहर परिचित आहे.चीनच्या मध्य भागातील हे सर्वात मोठे शहर आहे.
शहरात प्रामुख्याने ट्रांन्सपोर्टेशनचा व्यवसाय जोरात चालतो. स्टील, लोखंड, जहाज निर्माण, रसायन, कपडा, आणि खाद्य पदार्थ तयार करण्याचे मुख्य व्यवसाय या शहरात आहेत.

शानयांग
शानयांग हे शहर लियोनिंग प्रांताची राजधानी आहे. चीनच्या उत्तर पूर्व भागात असलेल्या शहरांतील हे मुख्य शहर आहे. विद्युत उपकरणं, विजे संबंधीची उपकरणं आणि अवजड मशीन शहरातील उद्योगांमध्ये तयार केल्या जातात.