इस्रायली सैन्याकडून गाझात शाळेवर हवाई हल्ल्यात 30 जण मृत्युमुखी
इस्रायली लष्कराने गाझामध्ये आणखी एक मोठा हवाई हल्ला केला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मध्य गाझा येथील देर अल-बालाह येथील शाळेवर इस्रायली हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी ठार झाले. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने हमास कमांड सेंटरला लक्ष्य केल्याचे सांगितले.ज्या भागात हा हल्ला झाला तो भाग विस्थापित कुटुंबांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागांपैकी एक आहे.
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, हमासचे दहशतवादी आमच्या सैनिकांवर हल्ले करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रांचे भांडार म्हणून शाळेचा वापर करत आहेत. हल्ल्यापूर्वी नागरिकांना सावध करण्यात आले होते. देर अल-बालाह येथील रुग्णवाहिकांनी जखमी पॅलेस्टिनींना अल-अक्सा रुग्णालयात वैद्यकीय सुविधेत नेले.
इस्रायली लष्कराने नागरिकांच्या मृत्यूसाठी हमासच्या दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे. लष्कराचे म्हणणे आहे की, त्यांनीच शाळेला दहशतीचे ठिकाण बनवले होते, त्यामुळेच हा हल्ला करण्यात आला. तर हमासने इस्रायलचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Edited By- Priya Dixit