रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 22 जुलै 2024 (12:17 IST)

Israel Hamas War: क्षेपणास्त्र हल्ल्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी केली मृतदेहावर शस्त्रक्रिया करून बाळाचे प्राण वाचवले

baby
गाझा पट्टीवर इस्रायलच्या हल्ल्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तात्काळ मृतदेहावर शस्त्रक्रिया करून नवजात बालकाला वाचवले. इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 24 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. एका कुटुंबातील सहा जण होते.

इस्रायलने मध्य गाझा भागातील निर्वासितांच्या छावणीवर क्षेपणास्त्राने हल्ला केला. नऊ महिन्यांची गर्भवती ओला अदनान हार्ब अल-कुर्दिश क्षेपणास्त्र हल्ल्यात जखमी झाली, असे गाझा येथील रुग्णालयाने शनिवारी सांगितले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, गर्भवती महिलेचे अल्ट्रासाऊंड केले असता बाळाच्या हृदयाचे ठोके कमी असल्याचे आढळून आले. तात्काळ सिझेरियन प्रसूती करून मुलाला बाहेर काढण्यात आल्याचे सर्जनने सांगितले. 
 
स्त्रीरोग विभागाचे प्रमुख रायद अल सौदी यांनी सांगितले की, नवजात बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याला तातडीने ऑक्सिजन आणि उपचार देण्यात आले. यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. मुलाला अल बालाह येथील अल अक्सा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीत लोकांचा मृत्यू होत असल्याचे सांगण्यात आले
 
Edited by - Priya Dixit