मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2024 (16:09 IST)

आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

fire
मॉरिशस मध्ये एका उत्सवा दरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवरात्रीच्या पूर्वी होणाऱ्या एका उत्सवात ही दुर्घटना घडली आहे. हिंदू देवतांच्या मूर्ती देवतांच्या मूर्ती दाखवणाऱ्या लाकडी आणि बांबूच्या गाडीला आग लागली. विजेच्या तारांच्या संपर्कात आल्यामुळे ही घटना घडली आहे. 

या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. असून सात जण जखमी झाले आहे. सदर घटना पूर्व आफ्रिकन बेट राष्ट्रातील हिंदू समुदाय कडून पवित्र मानले जाणारे शिवरात्री उत्सवापूर्वी तलावाकडे जात असताना ही दुर्देवी घटना घडली.या घटनेत 6 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला.  
 
 Edited by - Priya Dixit