गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2024 (09:44 IST)

मुसळधार पावसाने पाकिस्तानात कहर, गेल्या 48 तासांत आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू

heavy rain
पाकिस्तानात गेल्या 48 तासात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पाकिस्तानमध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 37 जणांना जीव गमवावा लागला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण पाकिस्तानमध्ये पावसामुळे घरे कोसळली आणि अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. परिस्थिती अशी आहे की उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अनेक रस्ते अडवण्यात आले होते. 

गुरुवारी रात्रीपासून अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये 25 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असे प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर म्हणाले की, पावसामुळे बाधित झालेल्या लोकांना या गंभीर वेळी एकटे सोडले जाणार नाही आणि त्यांच्या नुकसानीची योग्य ती भरपाई दिली जाईल

Edited By- Priya Dixit