शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 12 एप्रिल 2021 (15:09 IST)

ब्रिटनमधील कोरोना संसर्गात 60 टक्क्यांनी घट

एकीकडे देशव्यापी टाळेबंदी आणि कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या प्रभावी उपायांनी कोरोनाचा फैलाव कमी झालेला असतानाच मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सुमारे 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमधील संशोधकांना आढळून आले आहे.
 
ब्रिटनमधील कोविड-19 लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे या  विषाणूचा संसर्ग आणि गंभीर स्वरूपाचा आजार किंवा मृत्यू यांच्यातील साखळी तुटण्याची सुरुवात झाली असल्याचे  इंग्लंडमधील महासाथीबाबत सुरू असलेल्या अभ्यासाच्या ताज्या  निष्कर्षांमध्ये आढळले आहे.
 
लसीकरण कार्यक्रमात वृद्धांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे 65 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांना या कार्यक्रमाचा सर्वात जास्त फायदा  झाला असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता  सर्वात कमी आहे.
 
कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांच्यातील संबंध विभक्त होत असल्याचाही अभ्यासाचा निष्कर्ष आहे. व्यापक लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून  संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे यावरून दिसून आले आहे. देशातील 30 वर्षांहून कमी वयाच्या लोकांना शक्य असेल तेथे अॅरस्ट्राझेनेके लसीला पर्यायी लस देण्यात येईल, असे सुधारित निर्देश ब्रिटन सरकारने जारी केले आहे.