शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , सोमवार, 12 एप्रिल 2021 (09:27 IST)

कोरोनाला रोखण्यासाठी ‘या आमदाराचा’ पुढाकार ३०० रेमेडेसीविर, १०,००० एन-९५ मास्क, मतदारसंघात केली ६५० बेडची व्यवस्था!

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन हादरले आहे. राज्यासह जिल्ह्यात दररोज वाढणारी कोरोनाबाधित रूग्णांची संख्या विचार करायला लावणारी आहे.
 
ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कर्जत जामखेडचे आ.रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड, सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या ३०० रेमेडेसीविर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे.
 
नगर येथील कोरोनाचा वाढता आकडा पाहता तेथील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हा रुग्णालयास ५००० एन-९५ मास्क तर कर्जत-जामखेडसाठी ५००० एन-९५ मास्क पाठवण्यात आले आहेत.
 
कोरोना रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर हे कर्जतसाठी २५ तर जामखेडसाठी २५ आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत.
कर्जत तालुक्यातील रुग्णांचा झपाट्याने वाढत असलेला आकडा कमी करण्यासाठी आ. रोहित पवारांच्या माध्यमातून पुणे मुंबई शहरांच्या धरतीवर रुग्णांसाठी ३५० अद्ययावत बेडची व्यवस्था कर्जत जवळील गायकरवाडी येथे करण्यात येत असून,जामखेड येथेही ३०० बेडचे कोरोना सेंटर व्यक्तिगत स्वरूपातून उभा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.