शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (15:55 IST)

भाजप आमदाराच्या लाचखोर भावास अटक

नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोर लिपिक संजय पटेल हे नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांचे सख्ख्ये भाऊ आहेत, हे विशेष.
 
नळजोडणी मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यांच्याकडे संजय पटेल याने ३५ हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाती. त्यानुसार रंगपंचमीच्या दिवशी लिपिक पटेल यास १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
 
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने संजय वनारसीभाई पटेल (वय 45) यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहानिशा करून शुक्रवारी सायंकाळी (ता.२) सापळा रचला. त्यानुसार पथकाने त्यांना तक्रादाराकडून लाच स्वीकारताना अटक केली. संजय पटेल हे आमदार देवयानी फरांदे यांचे सख्ख्ये भाऊ आहेत, हे विशेष. याप्रकरणी पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चालू आहे.