मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (09:31 IST)

सचिन वाझेंसोबत असणाऱ्या महिलेला अखेर ताब्यात घेतले

The woman who was with Sachin Wazen was finally arrested
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणाचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सचिन वाझेंसोबत असणाऱ्या महिलेला अखेर ताब्यात घेतलं आहे. NIA ने विमानतळावरुन मीना जॉर्ज नावाच्या महिलेला ताब्यात घेतलं आहे.  या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
 
सचिन वाझेचे काळे पैसे पांढरे करण्याचं काम मीना जॉर्ज करत होती. दोन आयडींवरुन हे काम ती करत होती. नोटा मोजायची मशीन देखील याच महिलेजवळ होती. तसंच, ट्रायडेंट हॉटेलच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये जी महिला दिसली ती हीच होती, अशी माहिती आता समोर येत आहे. मीरारोडमध्ये राहणाऱ्या पियुष गर्ग यांच्या सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स सी विंग ४०१ या रुममध्ये ती राहत होती. १५ दिवसांपासून हि महिला गायब होती. या महिलेचा तपास NIA गेले काही दिवस करत होते. अखेर ही महिला NIA च्या ताब्यात आली आहे.
 
मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कनकिया परिसरातील सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स मध्ये NIA ची टीम दाखल झाली आहे. सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स सी विंग मधील फ्लॅट नंबर ४०१ मध्ये NIA ची टीम चौकशी करत आहे. मागील १५ दिवसांपासून तो फ्लॅट बंद होता. पियुष गर्ग यांचा हा रुम जाफर शेख इस्टेट एजंट दलाल यांच्या माध्यमातून तो मागील चार वर्षांपासून एका मीना जॉर्ज व त्यांची मूलं असे ख्रिश्चन कुटुबीयांना तो भाड्याने दिला होता. मात्र, मागील १५ दिवसांपासून तो रूम बंद होता.