शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (17:07 IST)

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अधिकृत यादी जाहीर, आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदार संघातील आमदार भास्कर जाधव यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने ते नाराज होते. आता शिवसेनेने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भास्कर जाधव यांचे नाव आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी त्यांच्या मुलाची वर्णी लावण्यात आली आहे. ते राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या घरात आता रत्नागिरी जिल्ह्याचे महत्वाचे पद आले आहे.  
 
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्या आदेशाने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत  आणि खासदार अरविंद सावंत  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्त्यांबरोबर अन्य प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यात खासदार प्रियंका चतुर्वैदी, परिवहन मंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव ,अंबादास दानवे, मनिषा कायंदे यांची नावे आहेत.
 
आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने नव्याने काही नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांच्याही नावाचा समावेश आहे.