गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (13:09 IST)

सोनिया गांधींऐवजी शरद पवारांना UPA अध्यक्ष करा असं म्हटलं नाही - संजय राऊत

यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाचं समर्थन करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर यूटर्न घेतलाय. सोनिया गांधी यांच्याऐवजी पवारांना UPA अध्यक्ष करा असं आपण कधीही म्हटलं नसल्याचं संजय राऊत म्हणाले. 
 
"विरोधी आघाडी आणखी मजबूत होण्याची गरज आहे. यासाठी सर्व विरोधी दलांनी राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत महाआघाडी उभारण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यावर आपण जोर दिला," असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
 
तसंच, "मी केवळ महाआघाडी मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची कोणत्याही पद्धतीनं निंदा केली नाही," असंही राऊत म्हणाले.
 
शरद पवार यांना UPA अध्यक्ष करण्याबाबत गेल्या काही महिन्यात संजय राऊत सातत्यानं बोलत असताना, यावेळी मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राऊतांना धारेवर धरलं. त्यानंतर राऊतांनी यूटर्न घेतला आहे.