गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (17:50 IST)

नियमांचे उल्लंघन करत बावधानची बगाड यात्रा संपन्न, हजारो भाविकांची उपस्थिती

बावधनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. तरी देखील भैरवनाथाच्या यात्रेचे बगाड शुक्रवारी माेठ्या उत्साहात पार पडले. हजाराे ग्रामस्थांनी उपस्थिती लावली हाेती.
 
बावधन येथील भैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी होते. यावेळी गावामध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने व यात्रेच्या अनुषंगाने गर्दी वाढू नये म्हणून गाव संपूर्ण गाव परिसर प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला होता. मागील आठ दिवसापासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. बगाड यात्रा होऊ नये यासाठी  गावामध्ये अनेक बैठका घेऊन ग्रामस्थांनी करोना काळामध्ये यात्रेला घातलेल्या बंदीबाबत जनजागृती करत बगाड यात्रा करू नये असे आवाहन केले होते.  मात्र तरीही अचानक पहाटे अचानक ग्रामस्थांनी बगाड रथ बांधून कृष्णा तीरावरून वाजत गाजत गावात आणला.
 
होळी पौर्णिमेच्या रात्री भैरवनाथ मंदिरात बगाड्या कौल लावून ठरविला जातो. दगडी चाके असलेला व संपूर्ण लाकडमध्ये बांधलेल्या बगाड रथाला बैलांच्या साह्याने ओढले जाते .एका वेळी किमान बारा ते सोळा बैल जोडून हा गाडा ओढला जातो.  बगाड यात्रेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत बगाडाचा रथ गावात बैलांच्या साहाय्याने गावात आणला. प्रशासनाने पहाटेच्या सुमाराला कृष्ण तीरावरील सोमेश्वर येथे ग्रामस्थांना बगाड मिरवणूक काढू नये अशी विनंती पुन्हा एकदा केली. मात्र या बंदीला सुधारक झुगारत ग्रामस्थांनी मिरवणूक बगाड मिरवणूक काढली. गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आल्याने किमान दहा हजार भाविक या यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले.