तैवाननंतर मेक्सिकोत 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला; 1 व्यक्तीचा मृत्यू, त्सुनामीचा इशारा
तैवाननंतर मेक्सिकोला भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत.मेक्सिकोच्या पॅसिफिक किनारपट्टीवर 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.याच्या धडकेने एकाचा मृत्यू झाला आहे.त्याचवेळी मदत आणि बचाव पथकांनी खबरदारी म्हणून अनेक इमारती रिकामी केल्या आहेत.त्याचबरोबर सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.05 वाजता भूकंपाच्या धक्क्याने पृथ्वी हादरली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोलिमा आणि मिचोआकन राज्यांच्या सीमेजवळ, 15.1 किमी खोलीवर, अक्विलाच्या 37 किमी आग्नेयेला होता.या भूकंपाची तीव्रता सुरुवातीला7.5 इतकी नोंदवण्यात आली होती.
मेक्सिकोमध्ये 1985 आणि 2017 मध्ये एकाच दिवशी (19 सप्टेंबर) भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे.
तैवानमध्ये झालेल्या जोरदार भूकंपात डोंगरावर अडकलेले सुमारे 400 पर्यटक सुखरूप खाली आले आहेत.रविवारी दुपारी तैवानमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.यामध्ये तीन मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार जण गाडले गेले, त्यांना नंतर वाचवण्यात आले.भूकंपामुळे एक रेल्वे रुळावरून घसरली, तर पुलाचेही नुकसान झाले.त्याचवेळी सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला.