रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (19:13 IST)

शत्रूच्या देशात एक आलिशान रिसॉर्ट आणि 14 हजार ज्यूंची सुटका, काय होती मोसादची गुप्त मोहीम?

tourist place
लाल समुद्राच्या किनाऱ्यावर, सुदानच्या वाळवंटात असलेलं 'आरोस' नावाचं ठिकाण पर्यटकांना आकर्षक वाटावं असं ‘टूरिस्ट कॉम्प्लेक्स’ होतं. मात्र, प्रत्यक्षात तो गुप्त कारवाया करणाऱ्या इस्रायली एजंटांसाठीचा एक तळही होता.
 
त्या गुप्त ऑपरेशनवर आधारित 'मिशन रेड सी' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
 
चकचकीत माहितीपत्रकात या ठिकाणाला ‘ सुदानच्या वाळवंटातलं डायव्हिंग आणि करमणूकीचं केंद्र’ म्हटलं होतं. हे लाल समुद्रातलं एक अद्भुत जग आहे, अशी जाहिरात करताना त्यांनी ‘जगातलं सर्वांत स्वच्छ पाणी’ यावरही भर दिला होता.
 
जाहिरातीतल्या मजकुरातही पुढे म्हटलं होतं की, संध्याकाळचे रंग उतरत गेल्यावर लाखो ताऱ्यांनी उजळलेल्या आकाशाचे चित्तथरारक दृश्य इथं रात्र पडताच प्रकट होते.
 
या दृश्याने आकर्षित होऊन युरोप आणि इतर ठिकाणाहून हजारो पर्यटक आरोस व्हिलेजला येत होते. इथल्या प्रवाळ बेटांना आणि जहाजांच्या अवशेषांना भेट देत होते.
 
पर्यटकांच्या कौतुकाने इथल्या व्हिजिटर्स बुकची पानं भरून जात होती.
सुदान इंटरनॅशनल टुरिस्ट कंपनीला ही जागा युरोपमधील उद्योजकांच्या गटाकडे सोपविण्याचा
 
निर्णय योग्य वाटायला लागला होता.
 
मात्र, या रिसॉर्टबद्दल सुदानमधल्या अधिकाऱ्यांना आणि येणाऱ्या पर्यटकांना एक गोष्ट अजिबातच माहीत नव्हतं. हे डायव्हिंग रिसॉर्ट 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या एजंटांनी बांधले होते. चार वर्षांहून जास्त काळ त्यांनी या रिसॉर्टची देखभाल केली.
 
त्यांच्या एका मिशनसाठी या रिसॉर्टचा वापर त्यांनी ‘कव्हर’ म्हणून केला. सुदानमधील बेवारस छावण्यांमध्ये राहणाऱ्या हजारो इथिओपियन ज्यूंना गुप्तपणे इस्रायलला नेण्यासाठी याचा वापर केला जात असे.
 
आफ्रिकन देश सुदान हा अरब देशांशी संबंधित होता. त्यामुळे सुदान आणि इस्रायल या दोन्ही देशांत काही हालचाली करायच्या असतील, तर त्या अत्यंत गुप्तपणे करणं अतिशय आवश्यक होतं. त्यामुळे केवळ या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या एजंटशिवाय इतर कोणालाही याबद्दल माहिती नव्हती.
 
इथिओपियन ज्यूंचे रहस्यमय मूळ
इथिओपियन ज्यू हे बीटा इस्रायल (हाऊस ऑफ इस्रायल) नावाच्या समुदायातील आहेत. त्यांचं मूळ हे खूप गूढ आहे.
 
ते इसवी सन पूर्व 950 मध्ये राणी शिबा आणि सालोमन राजाच्या मुलासोबत इथिओपियामध्ये आले. येताना त्यांनी आर्क ऑफ कॉन्व्हेन्टही सोबत चोरून आणली. यावर दहा आज्ञा कोरल्या आहेत, असं बायबलमध्ये आर्क ऑफ कॉन्व्हेन्टचं वर्णन करताना म्हटलं आहे.
 
इसवी सन पूर्व 586 मध्ये जेरुसलेममधील ज्युईश मंदिराचा विध्वंस झाल्यानंतर ते लपूनछपून इथिओपियाला आले असंही म्हटलं जातं.
 
इसवी सन पूर्व आठव्या शतकात इस्रायलवर आक्रमण झाल्यानंतर इथल्या दहा जमाती या इतिहासाच्या पानावरून जणू गायबच झाल्या होत्या. बीटा इस्रायल ही त्यांपैकीच एक जमात होती. 1970 च्या सुरूवातीला इस्रायलमधील प्रमुख धर्मगुरूंनीही हे मत मांडलं होतं.
 
इथिओपियन ज्यू हे तोराचे पालन करतात. हे बायबलचे ज्युईश रुपांतर आहे. सिनेगॉगसदृश इमारतीत ते प्रार्थना करतात. आपण हजारो वर्षांपूर्वी अन्य ज्यू समुदायांपासून वेगळं झालो असल्याचं ते मानतात.
 
त्यांच्यापैकी एक सदस्य, फरीद अकलूम हा 1977 साली सुदानला पळून गेला. सरकारविरोधी कारवाया केल्यामुळे इथिओपियन प्रशासन त्याच्या मागावर होते. त्याने बंडखोर गटांसोबत हातमिळवणी केली होती आणि तो ज्यूंना इस्रायलला जाण्यासाठी प्रोत्साहित करत होता.
 
त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले.
 
तो देशातील हिंसाचार आणि अन्न समस्येविरोधात अन्य बिगर ज्यू गटांशी हातमिळवणी करून देशाबाहेर जाण्याची योजना आखत होता.
 
फरीद अकलूमने मदत संस्थांना पत्र लिहून इस्रायलला पोहोचण्यासाठी मदत मागितली. त्यातील एक पत्र मोसादच्या हाती आलं. मेनाकेम बेगिन (1913-1992), इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान, स्वतः नाझी-व्याप्त युरोपमधील निर्वासित होते. त्यांच्या मते इस्रायल हे ज्यूंसाठी सुरक्षित आश्रयस्थान होतं, ज्यांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं.
 
इथिओपियन ज्यूही त्याला अपवाद नव्हते. त्यांनी याप्रकरणी गुप्तचर यंत्रणेला कारवाई करण्याचे आदेश दिले.
 
मोसादनं डॅनी नावाच्या एका एजंटला फरीद अकलूम यांना शोधण्याची आणि सुदानमधील बीटा इस्रायलींना इस्रायलमध्ये आणण्याचा मार्ग शोधण्याची जबाबदारी सोपवली.
 
डॅनी यांच्या म्हणण्यानुसार, "हे काम गवताच्या गंजीत सुई शोधण्याइतकं अवघड होतं. "
 
अथक प्रयत्नांनंतर डॅनी यांनी सुदानची राजधानी खार्तूममध्ये फरीद यांना शोधून काढलं. फरीदनं इथिओपियातील आपल्या समुदायाला संदेश पाठवला की जेरुसलेमचा रस्ता सुदानमधून जातो.
 
यामुळं 2,700 वर्षे जुनं स्वप्न साकार करण्याची एक संधी निर्माण झाली. 1985 च्या अखेरीस सुमारे 14,000 बीटा इस्रायलींनी 800 किलोमीटरचा प्रवास पायी करण्याचा धोका पत्करला होता.
 
गेडारेफ आणि कसालानी या सुदानी शहरांच्या आसपासच्या धोकादायक शिबिरांमध्ये प्रवासादरम्यान सुमारे 1,500 लोक मरण पावले किंवा त्यांचं अपहरण झालं.
 
मुस्लिमबहुल सुदानमध्ये ज्यू नसल्यामुळं, स्थानिक लोकांमध्ये मिसळण्यासाठी आणि सुदानच्या गुप्त पोलिसांकडून होणारा छळ टाळण्यासाठी त्यांनी आपला धर्म लपवला. धोका असूनही ते ज्यू परंपरेचा आदर करत राहिले.
 
बचाव मोहीम
त्यानंतर लवकरच, डॅनी आणि फरीद यांच्या नेतृत्वाखाली सुदानमधून छोट्या-छोट्या गटांनी गुप्तपणे पलायन सुरू झालं.
 
इथिओपियन ज्यू खोट्या कागदपत्रांसह खार्तूम विमानतळावर विमानात चढले आणि इस्रायलला गेले, परंतु अशा लोकांची संख्या वाढल्यानं दुसरा मार्ग शोधावा लागला.
 
त्या ऑपरेशनबद्दल बोलताना डॅनी म्हणाले, “मी सागरी मार्गाचा विचार केला. सुदान इथिओपियासारखा नव्हता. (तिथं स्थलांतर आणि डोंगराळ प्रदेशामुळं ज्यूंना समुद्रातून नेणं सोपं नव्हतं) जर सुदानमधून तांबड्या समुद्रातून लोकांची वाहतूक करता आली आणि बोटी उपलब्ध असतील तर ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ शकतं.”
 
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात संभाव्य 'लँडिंग बीच' शोधत असताना, डॅनी आणि इतर एजंट सुदानच्या किनारपट्टीवर प्रवास करत असताना त्यांना पोर्ट सुदान शहराच्या उत्तरेस सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोसमध्ये एक वापरात नसलेला रिसॉर्ट दिसला.
 
ते म्हणाले , “आम्ही जे पाहिलं ते आम्हाला काहीतरी खास वाटलं. एक मृगजळ. लाल छत असलेल्या इमारती होत्या आणि त्या सुदानमध्येच होत्या. "
 
रिसॉर्टची देखरेख करणाऱ्या एका व्यक्तीनं त्याला सांगितलं की रिसॉर्टचं व्यवस्थापन एका इटालियन कंपनीनं केलं होतं आणि काही वर्षांपूर्वी ते बंद झालं होतं.
 
"त्या माणसानं आम्हाला आत प्रवेश दिल्याबरोबर, आम्हाला कळलं की ते किती महत्त्वाचं आहे," डॅनी यांनी सांगितलं.
 
त्यानंतर काय झालं याची कथा 'मिशन टू द रेड सी' या चित्रपटात आहे. त्याचं चित्रीकरण नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेत झालं आहे. तिथं रिसॉर्टसारखा सेट बांधण्यात आला. ख्रिस इव्हान्सनं चित्रपटात डॅनीची भूमिका केली आहे, तर बाकीची पात्र डॅनीच्या टीममधील सदस्यांवर आधारित आहेत.
 
हा चित्रपट सत्यकथेवर आधारित नसून , प्रत्यक्षात जे घडलं ते काही दृश्यांमध्ये अस्पष्टपणे मांडलं आहे, परंतु चित्रपटाचे काही भाग हॉलीवूडपटांसारखे आहेत. (उदाहरणार्थ, एकाही ज्यूला कधीही रिसॉर्टमध्ये नेलं गेलं नाही, अमेरिकन लोकांना या ऑपरेशनबद्दल माहिती नव्हती आणि फारच कमी निर्वासितांना देशाबाहेर नेण्यात आलं.)
 
मूळ रिसॉर्टचं बांधकाम 1974 मध्ये पूर्ण झालं. त्यात 15 बंगले, एक स्वयंपाकघर आणि एक मोठा डायनिंग हॉल होता. तिथं पायाभूत सुविधा किंवा प्रवेश द्वार नव्हतं, परंतु इटालियन लोकांनी पोर्ट सुदान शहरामधून जनरेटर आणलं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
 
त्यांनी पाच वर्षे रिसॉर्टचं यशस्वीरित्या व्यवस्थापन केलं, परंतु सुदानी अधिकाऱ्यांनी निर्माण केलेल्या समस्यांनंतर रिसॉर्ट सोडलं. त्यानंतर एक वर्षाने ते बंद झालं.
 
"मोसादच्या पाठिंब्याशिवाय हे काम करणं कठीण झालं असतं," असं त्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या एका एजंटनं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
 
स्वत:ला स्वीडिश कंपनीचे संचालक (जे अस्तित्वात नव्हते) म्हणून ओळख देऊन, डॅनीनं सुदानच्या अधिकाऱ्यांना खात्री दिली की तो रिसॉर्टचं पुनरुज्जीवन करू शकतात आणि पुन्हा पर्यटक आणू शकतात. त्यावेळी भाडेतत्त्वाचा करार अडीच लाख डॉलरला झाला होता.
 
बनावट रिसॉर्ट
डॅनी आणि तिच्या टीमनं पहिलं वर्ष रिसॉर्टचं नूतनीकरण करण्यात घालवलं. एअर कंडिशनिंग, वॉटर स्पोर्ट्स उपकरणं आणि सुदानचं पहिलं विंड सर्फिंग बोर्ड यासह इस्रायलमध्ये बनवलेल्या उपकरणांची तस्करी करण्यात आली.
 
त्यांनी घरकाम करणारे, वेटर, एक ड्रायव्हर आणि स्वयंपाकी यांच्यासह 15 स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावर ठेवलं. एकाही कर्मचाऱ्याला रिसॉर्टचा खरा उद्देश माहीत नव्हता. ते मोसाद एजंट चालवत होता, हेही त्यांना माहीत नव्हतं.
 
डायव्हिंग उपकरण डेपोमध्ये आणणं वर्जित होतं. रेडिओचा वापर तेल अवीवशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी केला जात असे.
 
दिवसा ते पाहुण्यांची काळजी घेत असत आणि अधूनमधून एक तुकडी रात्री 900 किलोमीटर अंतरावर असलेल्या गदारेफजवळील बैठकीच्या ठिकाणी जात असे. इथल्या शेतात ओळख लपवून इथिओपियन ज्यू लपलेले होते.
 
"सुरुवातीला निर्वासितांना 24 तासांची नोटीस देण्यात आली की त्यांना बाहेर नेलं जाणार आहे . त्यांना कुठे जायचं हे सांगितलं गेलं नाही, परंतु जेरुसलेमला जायचं आहे हे समजले. परंतु अखेरीस आम्ही त्यांना जोखमीमुळं कोणतीही सूचना देऊ शकलो नाही. ते बाहेर पडले," डॅनी सांगतात.
 
तिथून, डझनभर गोंधळलेल्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या लॉरींच्या ताफ्यानं दोन दिवसांचा प्रवास केला, फक्त रात्रीचा प्रवास केला आणि दिवसा लपून राहिलो.
 
ऑपरेशनच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, वाहनं चेकपॉईंटमधून धावत असत, परंतु एका रक्षकानं गोळीबार केल्यानं ही प्रथा थांबली.
 
ज्यू जेव्हा वादी इथं उतरले, तेव्हा ते पवित्र शहरात आधीच पोचले आहेत या चुकीच्या समजुतीनं त्यांनी कधीकधी जमिनीचं चुंबन घेतलं.
एकदा ते हॉलिडे व्हिलेजजवळच्या किनार्‍यावर पोहोचले की, इस्रायली नौदलाचं विशेष सैन्य किनाऱ्यावर येईल, निर्वासितांना गोळा करतील आणि त्यांना पुढे समुद्रात वाट पाहत असलेल्या INS बॅट गलीम या इस्रायली जहाजात नेतील.
 
त्यानंतर जहाज त्यांना इस्रायलला घेऊन गेलं.
 
"हे सर्व धोकादायक होतं," अज्ञात चालक म्हणतो. "आम्हा सर्वांना माहीत होतं की जर आपल्यापैकी कोणीही सापडला तर आम्हाला खार्तूमच्या मध्यभागी फासावर लटकवलं जाईल."
 
मार्च 1982 मध्ये तो क्षण अगदी जवळ आल्या सारखा होता, जेव्हा अशा तिसऱ्या ऑपरेशनमध्ये सुदानी सैनिकांनी समुद्रकिनाऱ्यावर स्थलांतर करणाऱ्या गटाला पाहिलं. संभाव्य तस्करांचा संशय आल्यानं, एका सैनिकानं गोळीबार केला. पण इथिओपियन लोकांसह तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले.
 
त्यानंतर, असं ठरलं की नौदलमार्फत निर्वासितांची सुटका आता कठीण झालं आहे आणि एक नवीन योजना तयार केली गेली. C 130 हर्क्युलस विमानांसाठी वाळवंटात लँडिंगसाठी योग्य जागा शोधण्याचं काम एजंटांना देण्यात आलं होते. निर्वासितांना गुप्तपणे देशाबाहेर नेलं जाणार होतं.
 
दरम्यान, इस्रायलींनी डायव्हिंग रिसॉर्ट चालवणं आणि पाहुण्यांचं मनोरंजन करणं सुरू ठेवलं. आत्तापर्यंत, आरोस व्हिलेजनं खूप नावलौकिक मिळवला होता आणि प्रचार केला होता.
 
तिथे गेलेल्या एका अमेरिकन पाहुण्यानं मला सांगितलं, " आरोस खरोखर सुंदर गाव होतं."
 
"त्यांच्याकडे सुट्टी घालवण्यासाठी या सुंदर छोट्या केबिन होत्या आणि तुम्ही बोटीतून बाहेर पडून डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंगला जावू शकता. पाण्याखालील दृश्य चित्तथरारक होतं.
 
इजिप्शियन सैन्य युनिट, ब्रिटीश एसएएस सैनिकांचा एक गट, खार्तूममधील परदेशी मुत्सद्दी आणि सुदानी अधिकारी अशा विविध ग्राहकांमध्ये रिसॉर्ट लोकप्रिय होतं. सर्व त्यांच्या यजमानांच्या खऱ्या ओळखीबद्दल अनभिज्ञ होते.
 
आरोस व्हिलेज रिसॉर्टनं स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी पुरेसा पैसा कमावला, मोसाद मुख्यालयातील लेखापालांना दिलासा देण्यासाठी. निर्वासितांना घेऊन जाणार्‍या लॉरी विकत घेण्यासाठी किंवा भाड्यानं घेण्यासाठी हा पैसा वापरला जात होता.
 
सुरक्षिततेसाठी एअरलिफ्ट
दरम्यान, एअरलिफ्ट सेवा सुरू झाली. इस्रायली हवाई दलाच्या नियोजकांनी किनार्‍यापासून फार दूर नसलेलं दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश एयरफील्ड त्यांनी ओळखलं आणि मे 1982 मध्ये पहिलं हरक्यूलिस, इस्रायली कमांडोना घेऊन, रात्रीच्या वेळी तिथं उतरले.
 
"बर्‍याच इथिओपियन ज्यूंनी यापूर्वी कधीही लॉरी पाहिली नव्हती, त्यामुळं त्यांना हिरवे स्टिक दिवे लावणारे कमांडो एलियनसारखे दिसत होते आणि ते (विमानात) आत जायला घाबरत होते," डॅनी यांना ते आठवतं.
 
पण, दोन एअरलिफ्ट नंतर 'मोसाद'ला आढळलं की सुदानी अधिकाऱ्यांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली आहे आणि ते हल्ल्याची योजना आखत आहेत. त्यानंतर टीमला आणखी गुप्त लँडिंग साइट्स शोधण्याची सूचना देण्यात आली.
 
त्यांनी गेडारेफच्या अगदी जवळ योग्य ठिकाणं शोधली, ज्याचा फायदा निर्वासितांचा रस्ते मार्गाचा प्रवास वेळ दोन तासांपर्यंत कमी करण्याचा होता.
 
अज्ञात एजंटच्या म्हणण्यानुसार, "ते एअरस्ट्रीप नव्हतं, तो फक्त वाळवंटाचा भाग होता" अशी नकारात्मक बाजू होती.
 
" हवाई पट्ट्या क्वचितच उजळत असतं," तो म्हणतो. "आमच्याकडे फक्त 10 लहान इन्फ्रारेड दिवे होते आणि C130 पायलटना आम्हाला नेव्हिगेशनल सहाय्याशिवाय आणि दूरच्या कंटाळवाणा उड्डाणानंतर, धावपट्टी अंधारात शोधावी लागली.
 
" उड्डाणाचा संबंध लावला तर त्या तुलनेनं, एंटेबे एअरपोर्ट हे उत्तम होतं."
 
"1976 मध्ये युगांडामधील ओलीस ठेवलेल्या लोकांच्या धाडसी सुटका करण्यात आली होती, ज्यामध्ये एक इस्रायली हर्क्युलस विमानतळावर उतरला आणि पुन्हा उड्डाण केलं. कमांडोनं 100 हून अधिक लोकांना मुक्त केलं."
गुंतागुंत आणि धोका असूनही, 17 गुप्त उड्डाणं करण्यात आली, रेड सी डायव्हिंग रिसॉर्टच्या ( हॉलिडे डायव्हिंग विलेज) एजंट्स द्वारे समन्वय साधण्यात आला.
 
1984 च्या शेवटी, सुदानमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आणि निर्वासन आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
अमेरिकेच्या हस्तक्षेपानं, आणि मोठ्या प्रमाणात पैसे देऊन, सुदानचे अध्यक्ष, जनरल जाफर निमेरी, ज्यू निर्वासितांना खार्तूममधून थेट युरोपमध्ये पाठवण्यास तयार झाले. उर्वरित अरब जगाकडून होणारा विरोध टाळण्यासाठी त्यांनी संपूर्ण गुप्ततेच्या अटीवर असं केलं.
 
28 गुप्त एअरलिफ्ट मालिकेत, एका ज्यू बेल्जियन एअरलाइन्सच्या मालकानं दिलेल्या बोईंग विमानातून, 6,380 इथिओपियन ज्यूंना ब्रुसेल्स आणि नंतर थेट इस्रायलला नेण्यात आलं. या एअरलिफ्टचं सांकेतिक नाव ऑपरेशन मोझेस असं होतं.
 
इस्रायलमध्ये मीडियात अखेर ही बातमी लीक झाली.
 
रहस्य उलगडलं
जगभरातील वृत्तपत्रांनी 5 जानेवारी 1985 रोजी बातमी चालवली आणि सुदाननं तात्काळ उड्डाणं थांबवली.
 
"झियोनिस्ट-इथिओपियन प्लॉट" म्हणून इस्रायलशी संगनमत केल्याचा आरोप फेटाळून लावत त्याने सार्वजनिकपणे कोणताही सहभाग नाकारला.
 
दोन महिन्यांनंतर, अमेरिकेचे तत्कालीन उप-राष्ट्रपती जॉर्ज बुश यांच्या थेट विनंतीनंतर, 'ऑपरेशन मोझेस' अचानक थांबल्यामुळे अडकलेल्या 492 इथिओपियन ज्यूंना बाहेर काढण्यासाठी निमेरी यांनी सुदानमधून आणखी अंतिम गुप्त एअरलिफ्टला परवानगी दिली. निमेरीनं त्यांना युरोपला नेण्याचा आग्रह धरला असला तरी विमानांनी त्यांना थेट इस्रायलला नेलं.
 
मोसादने हॉलिडे व्हिलेज चालवणं चालू ठेवलं. तो एक गुप्त पर्याय म्हणून उपलब्ध ठेवला. ऑपरेशन तात्पुरतं थांबलं असलं तरी एजंट्सच काम सुरूच होतं, अजूनही पाहुण्यांचा ओघ सुरुच होता आणि रिसॉर्ट पूर्ण भरल्यावर इस्टरच्या वेळी अधिक लोकांसह उड्डाण केलं.
 
सुदानमधलं वातावरण बदलत होतं. मार्चमध्ये सुरू झालेल्या निमेरींच्या विरोधात रस्त्यावरील निदर्शनं वाढत गेली आणि 6 एप्रिल 1985 रोजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पदच्युत केलं. हॉलिडे विलेजच्या चालकांना अडचणीत आणणाऱ्या घटनांचं हे वळण होतं.
 
नवीन लष्करी गटानं अरब जगला आपली ओळख देण्यासाठी मोसाद हेरांना, वास्तविक किंवा काल्पनिक, संपवण्यावर आपली नजर वळवली.
 
मोसादच्या प्रमुखानं रिसॉर्ट रिकामं करण्याचे आदेश दिले. व्यस्त इस्टर आठवड्याच्या समाप्तीपर्यंत प्रतीक्षा करणं अधिक सुरक्षित असल्यानं, सदस्य थांबले. मग, एका योग्य क्षणी, त्यांनी कर्मचार्‍यांना सांगितलं की ते नवीन डायव्हिंग स्पॉट्स शोधण्यासाठी काही दिवसांसाठी इथून निघत आहेत.
"आमच्यापैकी सहाजण पहाटेच्या आधी दोन वाहनांतून हॉलिडे डायव्हिंग विलेज सोडलं," असं आणखी एक एजंट सांगतो, ज्यानं नाव न सांगण्याची विनंती केली.
 
"C 130 विमान उत्तरेकडे उतरलं, आम्ही यापूर्वी कधीही न वापरलेल्या लँडिंग स्पॉटवर. आम्ही त्यावर चढलो आणि घरी आलो."
 
" हॉलिडे विलेजमध्ये पर्यटक होते," ते सांगतात.
 
"ते जागे झाले असते आणि त्यांना वाळवंटात एकटे दिसले असते. स्थानिक कर्मचारी अजूनही तिथं होते, परंतु इतर कोणीही नाही. डायव्हिंग प्रशिक्षक, महिला व्यवस्थापक आणि असेच, सर्व कॉकेशियन गायब झाले होते."
 
जेव्हा विमान तेल अवीवच्या बाहेर हवाई दलाच्या तळावर उतरलं, तेव्हा ते ज्या सुदानी वाहनांमध्ये चढले होते त्याच सुदानी वाहनांमधून ते बाहेर पडले.
 
एजंट अचानक निघून गेल्याच्या पार्श्वभूमीवर हॉलिडे डायव्हिंग विलेज बंद पडलं.
 
पुढील सहा वर्षांच्या कालावधीत, आणखी ऑपरेशन्स पुढे आली, ज्यू राज्यामध्ये आपल नवीन जीवन सुरू करण्यासाठी एकूण सुमारे 18,000 बीटा इस्रायल ( इथिओपियन ज्यू ) लोकांना इथं आणलं होत .
 
फरीी अकलूम यांचा 2009 मध्ये मृत्यू झाला तेव्हा हजारो बीटा इस्रायलींसह मोसादचे प्रमुख आणि माजी प्रमुख त्याच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते. ते त्यांच्यासाठी राष्ट्रीय नायक होते आणि राहतील.1980 मध्ये त्यांना इस्रायलला आणण्यात आलं होतं.
 
डॅनी म्हणाले, "ते माझ्यासाठी भावासारखे होते. त्यांच्याशिवाय आणि इथिओपियन ज्यूंच्या शौर्याशिवाय, यापैकी काहीही शक्य झालं नसतं."
 











Published By- Priya Dixit