रशियामध्ये लष्करी विमान कोसळले, विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू
दक्षिण रशियातील एका विमानतळापासून थोड्याच अंतरावर एक लष्करी विमान कोसळले, ज्यात विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दक्षिण रशियामध्ये एक लष्करी विमान कोसळले, ज्यात विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, यागुनोवो गावाजवळ, एका स्थानिक विमानतळाजवळ एन-१२ हे लष्करी विमान कोसळले ज्यात विमानातील सर्व १७ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात नैऋत्य सायबेरियातील केमेरोवो ओब्लास्टमधील यागुनोवो गावाजवळ घडला. कुझबासचे गव्हर्नर इल्या सेरेड्युक यांनी सांगितले की, हा अपघात स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे ९:३० वाजता घडला. सेरेड्युक यांनी सांगितले की, अपघातस्थळी एक आपत्कालीन प्रतिसाद केंद्र उभारण्यात आले आहे, जिथे वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, आपत्कालीन सेवा आणि नॅशनल गार्डचे सैनिक तैनात करण्यात आले आहे.
ALSO READ: सैनिकांच विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू

