गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (16:55 IST)

अल्पवयीन मुलाने शाळेत गोळीबार केला, 3 विद्यार्थी ठार, 6 जखमी

A minor boy opened fire at the school
ऑक्सफर्ड टाऊनशिप .अमेरिकेतील मिशिगन येथील एका हायस्कूल मध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या हृदयद्रावक अपघातात 3 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले.
ऑक्सफर्ड टाऊनशिप मधील ऑक्सफर्ड हायस्कूल मध्ये गोळीबार करणाऱ्या मुलाचा हेतू अद्याप कळू शकला नाही. असे ऑकलंड काऊंटी अंडरशेरीफ माईक मॅककेब यांनी सांगितले. सुमारे 22 हजारची लोकसंख्या असलेले हे शहर डेट्राईटपासून 30 मैलाच्या अंतरावर आहे. 
ते म्हणाले की, शाळेत हल्लेखोर असल्याची माहिती आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक 911 वर मिळाल्यावर पोळी दुपारी 12:55 वाजता घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एक सेमी आटोमेटिक बंदूक जप्त करण्यात आली आहे.