अमेरिकेत भीषण अपघातात भारतीय कुटुंबाचा मृत्यू
अमेरिकेतील डॅलस येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात हैदराबादच्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील एका दुःखद रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब भारतातील हैदराबाद येथील रहिवासी होते. डॅलसमध्ये कुटुंबातील सदस्य प्रवास करत असलेल्या कारला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाची ओळख तेजस्विनी आणि श्री वेंकट अशी झाली आहे. हे कुटुंब त्यांच्या मुलांसह अमेरिकेत सुट्ट्या साजरे करत होते.
अटलांटाहून डॅलसला परतताना हा अपघात झाला. हैदराबादमधील हे कुटुंब गेल्या आठवड्यात त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अटलांटा येथे गेले होते. एका आठवड्यानंतर अटलांटाहून डॅलसला परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येणाऱ्या एका मिनी ट्रकने कारला धडक दिली. टक्कर होताच कारने पेट घेतला आणि त्यातील सर्व लोक जागीच ठार झाले. अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik