शुक्रवार, 4 जुलै 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जुलै 2025 (19:42 IST)

इस्रायलकडून गाझामध्ये हल्ला, आयडीएफच्या हल्ल्यात ८२ जणांचा मृत्यू

Israel army entered in Gaza
इस्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये हाहाकार माजवला आहे. इस्रायली सैन्याच्या ताज्या हल्ल्यात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. गाझामध्ये मृतांचा आकडा ५६ हजारांच्या पुढे गेला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार गाझामध्ये इस्रायलचा हाहाकार सुरूच आहे. इस्रायल गाझामध्ये सतत भीषण हल्ले करत आहे. तसेच, रात्रभर गाझामध्ये हवाई हल्ले आणि गोळीबारात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आवश्यक मानवीय मदत साहित्य मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडलेल्या ३८ जणांचा समावेश आहे. गाझाच्या रुग्णालयांनी आणि आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी गाझामध्ये झालेल्या हल्ल्यांवर इस्रायली सैन्याने त्वरित भाष्य केलेले नाही.
 
हल्ले कुठे झाले?
'गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन'शी संबंधित स्थळांभोवती इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, गाझा पट्टीतील इतर ठिकाणी मदत साहित्य पोहोचवणाऱ्या ट्रकची वाट पाहणाऱ्या ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. 
Edited By- Dhanashri Naik