मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 29 डिसेंबर 2024 (10:48 IST)

दक्षिण कोरियात अपघात; धावपट्टीवर स्फोट झाल्यानंतर विमानाला आग,85 जणांचा मृत्यू

south korea plane accident
दक्षिण कोरियातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी विमानाला आग लागल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात 85 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमान बँकॉकहून परतत होते. विमानात 175 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानावर सहा क्रू मेंबर्सही होते. आपत्कालीन कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, विमान धावपट्टीवरून घसरले आणि एका भिंतीवर आदळले, त्यानंतर त्याला आग लागली. या अपघातातील मृतांचा आकडाही वाढू शकतो. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान जेजू एअरचे होते आणि बोइंग 737-800 होते. आग विझवल्यानंतर बचाव अधिकारी विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीचे कारण तपासले जात आहे. 

ही घटना सकाळी 9:07 वाजता घडली, जेव्हा जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि सोलच्या नैऋत्येस सुमारे 288 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुएन काउंटीमधील मुसान आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुंपणाला आदळले. विमानाच्या मागील भागात 47 मृतदेह सापडले आहेत. एकूण 85 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
 
Edited By - Priya Dixit