1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:18 IST)

आश्चर्याचा धक्का देणारी तरुणीच्या सोंदर्याची कहाणी

acid attack victim

लंडनमधील अॅसिड हल्ला झालेल्या तरूणीचा हा फोटो पाहिल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. जून महिन्यात अॅसिड हल्ला झालेल्या एका 21 वर्षीय तरूणीने तिच्या प्रकृतीत वेगाने होत असलेल्या सुधारणेचा फोटो शेअर केला आहे. त्या तरूणीचा फोटो सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. बिझनेस मॅनेजमेंटची विद्यार्थी तसंच मॉडल असलेल्या रेशम खान या तरूणीवर 21 जून 2017 रोजी तिच्या एकसाव्या वाढदिवसाच्या दिवशी सल्फर अॅसिड अंगावर फेकून हल्ला झाला होता. लंडनमध्ये सकाळी चुलत भावाबरोबर ड्राइव्हवर जाताना ही घटना घडली होती. या अॅसिड हल्ल्यात रेशमचा चेहरा भाजला होता. तसंच शरीरावरही अॅसिड पडल्याने काही ठिकाणी भाजलं होतं. अॅसिड हल्ल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात रेशमने तिच्या प्रकृतीत सुधारणा करून दाखवली. ईदच्या दिवशी तिने तिचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.