गोव्यातील कांदोळीत हिमाचल प्रदेशच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू
पणजी – मित्रांसमवेत हिमाचल प्रदेश येथून गोव्यात आलेल्या अशत्राय दत्ता या 27 वर्षीय युवकाचा कांदोळी येथील समुद्रात बुड़ुन मृत्यू झाला. अशत्राय हा आपल्या मित्रां समवेत कांदोळी येथील हॉटेल मध्ये उतरला होता. आज पहाटे तो आपल्या 3 मित्रां सोबत समुद्रात उतरला होता. त्याच दरम्यान आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्याने अशत्राय समुद्रात ओढ़ला गेला. त्याच्या मित्रांनी त्याला शोधून वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर मित्रांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना देखील अशत्राय सापडू शकला नाही. सकाळी 8 वाजता अशत्रायचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला. कळंगुट पोलिसांनी पंचनामा करून दत्ताच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आहे.