मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (13:56 IST)

बांगलादेशातील कंटेनर डेपोला भीषण आग, आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू, 450 हून अधिक होरपळले

fire at a container depot in Bangladesh. Sitakundu of Chittagon In Bangladesh 35 killed in Blast Marathi International News In Webdunia Marathi
दक्षिणपूर्व बांगलादेशातील एका खाजगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 35 लोक ठार झाले आहेत आणि 450 हून अधिक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. शनिवारी रात्री चटगांव बंदरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या सीताकुंडू येथे कंटेनरला आग लागल्याची घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
शनिवारी रात्री चटगांवच्या सीताकुंडू अप-जिल्ह्यातील कदमरसूल परिसरात असलेल्या बीएम कंटेनर डेपोला आग लागून पोलीस आणि अग्निशमन दलासह शेकडो लोक जळून खाक झाले. डेपोला लागलेल्या आगीत आणि त्यानंतरच्या स्फोटात किमान 35 लोकांचा मृत्यू झाला, तर पोलीस आणि अग्निशमन दलासह शेकडो जण जखमी झाले, असे वृत्त मिळाले आहे. या घटनेत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी किमान 350 सीएमसीएच मध्ये आहेत. 
 
चटगावातील आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्ताकुल इस्लाम यांनी सांगितले की, इतर रुग्णालयांमध्ये मृतांची संख्या जास्त असू शकते. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांचाही या घटनेत मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.