शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 जानेवारी 2024 (16:08 IST)

युक्रेनजवळ रशियन लष्कराचं विमान कोसळलं, किमान 65 जणांचा मृत्यू झाला

रशियन सैन्याच्या विमानाला युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेल्गोरोद भागात अपघात झाला आहे.
 
रशियन माध्यमांनी संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटलं आहे की, या विमानातील किमान 65 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
या विमानात युक्रेनमधील सशस्त्र दलांचे पकडण्यात आलेले कर्मचारीही असल्याची माहिती रिया नोवोस्ती या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
 
या भागाचे गर्व्हनर व्याचेस्लाव ग्लादकोव्ह यांनी सांगितलं की, त्यांना या घटनेची माहिती आहे, मात्र त्यांनी यापेक्षा अधिक काहीही सांगितलं नाही.
 
सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये विमान खाली कोसळताना दिसत आहे.
 
रशियाच्या राष्ट्रपती भवनाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं की, क्रेमलिनला या दुर्घटनेची माहिती आहे. मात्र, त्यांनी सविस्तर माहिती द्यायला मनाई केली आहे.