शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 22 मे 2022 (14:44 IST)

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बानीज : 'बुलडोजर' वर 'बिल्डर' भारी कसे पडले?

Anthony Albanese
- टिफनी टर्नबुल
एका दशकाहून अधिक काळानंतर लेबर पार्टीला निवडणुकीत विजय मिळवून दिल्यानंतर अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनणार आहेत.
 
ऑस्ट्रेलिया मध्ये सर्वाधिक काळ सक्रिय राजकारण्यांपैकी एक असलेल्या अल्बानीज यांनी मतदारांना "सेफ चेंज" करण्याचे वचन देत त्यांनी 2013 पासून सत्तेत असलेल्या पुराणमतवादी लिबरल-नॅशनल युतीला बाहेर काढण्याचे काम केले.
 
मावळते पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे स्वघोषित 'बुलडोजर' आहेत, अल्बानीज यांनी 'बिल्डर' होण्याचे वचन दिले आहे.
 
कोरोनामुळे एकमेकांपासून तुटलेली ऑस्ट्रेलियन राज्ये आणि कडक लॉकडाऊनमुळे विभागलेली शहरे यामध्ये ऐक्य वाढवणे ही नव्या सत्ताधाऱ्यांचे प्राधान्य असेल असे सांगण्यात आले आहे.
 
शनिवारी रात्री विजयी भाषणात बोलताना अल्बानीज म्हणाले "मला ऑस्ट्रेलियन लोकांना एकत्र आणायचे आहे. मला आमचा समान उद्देश शोधायचा आहे. एकता आणि आशावाद वाढवायचा आहे, भीती आणि विभाजन नाही."
 
अँथनी अल्बानीज कोण आहे?
अल्बानीज यांनी ऑस्ट्रेलियाच्या मोफत आरोग्य सेवा प्रणालीचे रक्षक, एलजीबीटी समुदायाचे वकील, रिपब्लिकन आणि रग्बी लीगचे उत्कट चाहते म्हणून मोठे नाव कमावले आहे.
 
59 वर्षीय - टोपणनाव अल्बो यांना त्यांच्या आईने अपंगत्व पेन्शनवर सोशल हाऊसिंगमध्ये वाढवले. अनेकदा त्यांनी त्यांच्या संगोपनाचा त्यांच्या पुरोगामी विश्वासांचा पाया म्हणून उल्लेख केला आहे.
 
अल्बानीज यांचा असा विश्वास होता की त्याचे वडील त्याचा जन्म होण्यापूर्वीच मरण पावले होते. परंतु किशोरवयातच त्याला कळले की त्याची आई युरोपमध्ये प्रवास करत असताना एका विवाहित पुरुषापासून गरोदर राहिली होती, जो बहुधा जिवंत होता.
 
तीन दशकांनंतर त्यानी कार्लो अल्बानीजचा मागोवा घेतला आणि तो प्रथमच त्याच्या वडिलांना आणि त्याच्या सावत्र भावंडांना भेटण्यासाठी इटलीला गेले.
 
अल्बानीज म्हणाले की त्यांची आई, मेरीन एलेरी, तिने कधीही न केलेल्या संधी मिळतील याची निश्चय केला होता. तिच्या पाठिंब्यामुळेच शाळा संपवून विद्यापीठात जाणारा तो त्याच्या कुटुंबातील पहिला व्यक्ती ठरला.
 
स्वतःच्या मुलासाठी, नाथनसाठी एक चांगले आयुष्य निर्माण करणे हीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची प्रेरणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अल्बानीज 2019 मध्ये त्यांच्या पत्नीपासून वेगळे झाले परंतु जोडी हेडन त्याच्यासोबत प्रचाराच्या दरम्यान त्यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या.
 
25 वर्षं खासदार
2019 मध्ये बिल शॉर्टन यांच्या धक्कादायक निवडणुकीत पराभवानंतर अल्बानीज तीन वर्षांपासून लेबर पार्टीचे नेते आहेत. पण 20 पासून ते मजूर पक्षाचे नेते आहेत.
 
1996 मध्ये त्यांच्या 33 व्या वाढदिवसाला सिडनी इनर सिटी जागेवर निवडून येण्यापूर्वी त्यांनी दोन्ही फेडरल आणि राज्य राजकारणात काम केले.
 
2007 मध्ये, जेव्हा केविन रुडच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टी सत्तेत आली तेव्हा अल्बानीज यांना पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री बनवले होते.
 
2010 मध्ये मिस्टर रुडच्या जागी ज्युलिया गिलार्ड यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष गोंधळाच्या काळात प्रवेश करत असताना ते एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व राहिले.
 
2013 मध्ये जेव्हा मिस्टर रुड यांनी पंतप्रधानपदावर पुन्हा दावा केला. तेव्हा अल्बानीज यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना उपपंतप्रधानपदी नियुक्त केले गेले. परंतु त्यांनी केवळ 10 आठवडे या पदावर काम केले कारण त्यानंतरच्या निवडणुकीत लेबर पार्टीचा पराभव झाला.
 
त्यानंतर अल्बानीज यांनी स्वतःला पक्षाचे प्रमुख होण्यासाठी पुढे केले. रँक-अँड-फाइल पक्षाच्या सदस्यांमध्ये लोकप्रिय असूनही, प्रतिस्पर्धी बिल शॉर्टन यांना संसदेच्या सदस्यांमध्ये अधिक पाठिंबा होता. त्यामुळे ते ऑस्ट्रेलियाचे विरोधी पक्षनेते बनले.
 
परंतु अल्बानीज यांना अखेर 2019 मध्ये संधी मिळाली. जेव्हा शॉर्टेन दोन निवडणुका हरले आणि लेबर पार्टीचे नेते म्हणून ते पदमुक्त झाले.
 
ऑस्ट्रेलियाचे पुढचे पंतप्रधान
अल्बानीज हे लेबर पार्टीच्या डाव्या गटाचे प्रमुख आवाज आहेत, परंतु नेता बनल्यापासून त्यांनी स्वतःला केंद्राकडे अधिक स्थान दिले आहे.
 
निवडणुकीच्या आघाडीवर "नॉट वोक" (जागे झालेला नाही) हे सिद्ध करण्यासाठी त्यांना त्रास झाला. 2019 च्या मतदानात पक्षाचा त्याग करणाऱ्या अधिक पुराणमतवादी मतदारांना आवाहन केले.
 
यामध्ये चीन आणि राष्ट्रीय सुरक्षेवर कठोर वक्तृत्व करतानाच आक्रमक हवामान कृती धोरणांना पाठिंबा देण्याचा समावेश होता.
 
बोटीने येणार्‍या कोणत्याही निर्वासितांना परत पाठवा, या ऑस्ट्रेलियाच्या वादग्रस्त धोरणाचे त्यांनी समर्थन देखील केले आहे. ज्याला त्यांनी एकदा जाहीरपणे विरोध केला होता.
 
अल्बानीज यांनी अलीकडच्या काही वर्षांत शारीरिक परिवर्तन केले आहे. वजन कमी केले असून नवीन वॉर्डरोब डेब्यू केला आहे. यामागे वेकअप कॉल म्हणून 2021 मधील कार अपघाताला श्रेय दिले आहे.
 
तरीही देशातील समस्याग्रस्त वृद्ध काळजी क्षेत्रावर मोठा खर्च, स्वस्त चाइल्ड केअर आणि उत्पादन उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याचे आश्वासन देऊन ते आपल्या श्रमिक मुळाशी खरे उतरले आहेत.
 
लेबर पार्टीने संविधानात संसदेला स्वदेशी आवाज समाविष्ट करण्यावर सार्वमत घेण्याचे वचन दिले आहे. एक सल्लागार संस्था जी आदिवासी आणि टोरेस स्ट्रेट आयलँडर लोकांना प्रभावित करणारी धोरणे तयार करण्यात भूमिका मांडेल.
 
अल्बानीज यांनी या वचनाचा पुनरुच्चार करून विजयी भाषण सुरू केले.
 
त्याच्या स्वतःच्या संगोपनाचा संदर्भ देत कोणत्याही ऑस्ट्रेलियन लोकांना मागे न ठेवण्याची त्याची दुसरी महत्त्वाची प्रतिज्ञा होती.
 
"आपल्या महान देशाबद्दल ते बरेच काही सांगतात जसे की अपंगत्व निवृत्तीवेतनधारक असलेल्या एका आईचा मुलगा, जो सार्वजनिक निवासस्थानात वाढला. आज रात्री ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान म्हणून तुमच्यासमोर उभा राहू शकतो."
 
"माझी इच्छा आहे की ऑस्ट्रेलिया असा देश असावा की तुम्ही कुठे राहता, कोणाची उपासना करता, तुम्हाला कोणावर प्रेम आहे किंवा तुमचे आडनाव काय आहे हे महत्त्वाचे नाही. ज्यामुळे तुमच्या जीवनातील प्रवासावर कोणतेही बंधन नाही."
 
"मला आशा आहे की माझ्या आयुष्यातील प्रवास ऑस्ट्रेलियन लोकांना स्टार्सपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देईल."