रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (14:27 IST)

बांगलादेशात बोडेश्वरी मंदिरात हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणारी बोट उलटली; 24 मृत, अनेक बेपत्ता

बांगलादेशातील बोडेश्वरी मंदिरात हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणारी बोट रविवारी कोरोटा नदीत उलटली, त्यात 24 जणांचा मृत्यू झाला आणि डझनहून अधिक बेपत्ता झाले.बांगलादेशातील पंचगड जिल्ह्यात महालयाच्या (दुर्गा पूजा उत्सवाच्या सुरूवातीस) भाविक बोटीतून बोडेश्वरी मंदिरात जात असताना ही घटना घडली.
 
पंचगढच्या बोडा उप-जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख सोलेमान अली म्हणाले, “बोट उलटण्याच्या घटनेत सुमारे 24 जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये आठ अल्पवयीन मुले आणि 12 महिलांचा समावेश आहे.काहींना स्थानिक रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक गोताखोर बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.
 
 दुर्गापूजा उत्सवानिमित्त इंजिनवर चालणारी बोट भाविकांना जुन्या बोडेश्वरी मंदिरात घेऊन जात होती.पंचगढचे उपायुक्त किंवा प्रशासकीय प्रमुख झहुरुल हक यांनी सांगितले की बोट क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात होती.त्या बोटीत सुमारे 70 ते 80 प्रवाशी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
बांगलादेशात रविवारपासून सुरू झालेल्या दुर्गापूजेदरम्यान हजारो हिंदू दरवर्षी मुस्लिमबहुल बांगलादेशातील बोडेश्वरी मंदिराला भेट देतात.बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांना जिवंतांवर उपचार आणि मृतांना नुकसान भरपाईसाठी तातडीने पावले उचलण्यास सांगण्यात आले.